तुळजापूर (प्रतिनिधी)- सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील तुळजापूर धाराशिव रस्त्यावर असणाऱ्या बोरी गावानजीक एका ढाब्याला सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास अचानक आग लागली. ही आग शाँर्टसर्कीटने लागल्याचा दावा धाबे मालकाने केला असला तरी अवैधरित्या साठवलेल्या बायोडिझल साठ्यामुळे लागल्याची चर्चा असुन याचा शोध घेण्याची मागणी होत आहे.
पोलिसांनी प्रथम दर्शनी शाँर्टसर्कीट किंवा गँस सिलेंडरचा स्फोटामुळे आग लागल्याची शक्यता वर्तवली असली तरी आगीच्या ज्वाळाचे स्वरुप धुराचा महालोळ पार्श्वभूमीवरही आग साठवण केलेल्या बायोडीझलमुळे लागल्याचा संशय व्यक्त होत आहे. येथे काही सिंटँक्स टाक्या सापडल्याचे समजते. तर येथे लावलेला एक टँकर कुठे गेला या बाबतीत सांशकता व्यक्त केली जात आहे. आगीचे रुद्र स्वरुप पाहता ही आग बायोडीझलची असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सदर ठिकाणी अवैध बायोडिझेल विक्री होत असल्याचा संशय बळवत आहे.