धाराशिव (प्रतिनिधी)- भारत देशाच्या अखंडतेसाठी, क्षत्रिय लढवय्ये महाराणा प्रताप सिंह यांचे मोठे योगदान आहे. असे मत भगतसिंह गहेरवार यांनी व्यक्त केले. धाराशिव येथे महाराणा प्रतापसिंह चौकात 09 मे 2025 रोजी झालेल्या जयंती कार्यक्रमात ते बोलत होते.
महाराणा प्रताप सिंह चौकामध्ये येथील राजपूत समाज बांधवांच्या वतीने जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जयंती समिती कार्यक्रमाचे प्रमुख भगतसिंह गहेरवार,राकेश पांडे,शिवरत्न तौर यांच्या हस्ते महाराणा प्रताप क्षणी यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी बोलताना गहेरवार म्हणाले की, मातृभूमीचे रक्षण करण्यासाठी महाराणा प्रतापसिंह यांनी आपले आयुष्य पणाला लावले प्रचंड धाडसी लढवय्या आणि क्षत्रिय म्हणून महाराणा प्रताप सिंह यांचा इतिहास सुवर्ण अक्षरांनी लिहिलेला आहे,देशाच्या अखंडते करिता त्यांचे खूप मोठे योगदान आहे असे ते म्हणाले.धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये,मान्यवरांच्या उपस्थितीत महाराणा प्रताप सिंह यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी गोविंदसिंह राजपूत,मनोजसिंह ठाकुर, खालील शेख,कृपालसिंह ठाकुर, तेली समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवी कोरे आळणीकर आदींची उपस्थिती होती.