धाराशिव (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी विद्यार्थ्यांची जात पडताळणीची प्रकरणे तातडीने निकाली काढावी असे निर्देश राज्य मागासवर्ग आयेागाचे सदस्य प्रा.डॉ.गोविंद काळे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 या कालावधीत इतर मागासवर्ग,विशेष मागास प्रवर्ग,विमुक्त जाती व भटक्या जमाती या संवर्गास वितरीत केलेली जात प्रमाणपत्रे व भटक्या जमाती ब संवर्गातील भोपे (पुजारी) यांना जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्राबाबत येणाऱ्या अडचणीचा आयोजित बैठकीत आढावा घेताना प्रा.डॉ.श्री.काळे बोलत होते. यावेळी राज्य मागासवर्ग आयेागाचे सदस्य डॉ.माऊली शिकारे, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष प्रकाश अहिरराव,निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव,जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य बलभिम शिंदे, उपविभागीय अधिकारी अरूणा गायकवाड, उपविभागीय अधिकारी संजय पवार,उपविभागीय अधिकारी संजय पाटील,उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील, शिक्षणाधिकारी सुधा साळुंके यांची प्रमुख उपस्थिती.


नंतरच पदभरती करावी

काळे म्हणाले, भोपे (पुजारी) बाबत जी पुराव्याची यादी आहे, त्याला प्रतिज्ञापत्र जोडावे, पवित्र पोर्टलवर संवर्गनिहाय पदभरतीची माहिती उपलब्ध करून द्यावी, बिंदू नामावली तपासून द्यावी, त्यानंतरच पदभरतीची पुढील कार्यवाही करावी, असे त्यांनी सांगितले. अहिरराव म्हणाले, जात वैधता प्रमाणपत्रासाठी पुरावे दिल्यानंतरच कार्यवाही करता येईल आवश्यक ते कागदपत्रे तपासणी करूनच त्याबाबत निर्णय घेण्यात येईल असे त्यांनी सांगितले. जात प्रमाणपत्र देतांना आवश्यक ते पुरावे सादर केल्यानंतरच प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे भूमच्या उपविभागीय अधिकारी पाटील यावेळी म्हणाल्या.



तीन महिन्यात प्रकरण निकाली काढा

तीन ते पाच महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र प्रकरणे निकाली काढण्यात येतात त्यापेक्षाही कमी कालावधीतही प्रकरणे निकाली काढण्यात येत असल्याची माहिती जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त शिंदे यांनी दिली. 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 या कालावधीत इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्ग,विमुक्त जाती व भटक्या जमाती या संवर्गातील एकुण 4703 प्रकरणे प्राप्त झाली. त्यापैकी 4593 वैध, अवैध प्रलंबित 104 प्रकरणे होती.प्रकरणे अवैध ठरण्याची कारणे मुखत: मानिव दिनांकापूर्वीचे पुरावे व वंशावळ सिध्द करणारे पुरावे सादर केले नाही. संदिग्ध बनावट पुरावे सादर केले आहे. भटक्या जमाती व संवर्गातील भोपे (पुजारी) या संवर्गातील 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 या कालावधीमध्ये जात वैधता प्रमाणपत्रासाठी 51 प्रकरणे वैध ठरली आहेत.6 प्रकरणे प्रलंबित आहेत अशी माहिती शिंदे यांनी दिली.



20 हजार प्रमाणपत्र वाटप

इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग,विमुक्त जाती,भटक्या जमाती यांना उपविभाग निहाय दिनांक 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 या कालावधीत धाराशिव उपविभागात इतर मागास वर्ग या प्रवर्गातील 6074 जात प्रताणपत्र, विशेष मागास प्रवर्गातील 236 जणांना,विमुक्त जाती प्रवर्गातील 877 जणांना, भटक्या जमाती प्रवर्गातील 2134 जणांना असे एकुण 9321 जात प्रमाणपत्र वितरीत करण्यात आली. भूम उपविभागतील वरील प्रमाणे 3272, उमरगा उपविभागात 3568,कळंब उपविभागात 4242 असे एकुण 20 हजार 403 जात प्रमाणपत्र वितरीत करण्यात आली.

 
Top