तुळजापूर (प्रतिनिधी)- भावनिक बुद्धिमत्ता आयुष्यात यशस्वी होण्यासाठी अधिक महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख यांनी केले. पंचरंग प्रतिष्ठान, तुळजापूर यांच्या वतीने आयोजित व्यक्तिमत्व विकास शिबिराचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाचे उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत नाडापुडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य मार्गदर्शक तुषार भद्रे उपस्थित होते.
उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. देशमुख यांनी बौद्धिक बुद्धिमत्ता आणि भावनिक बुद्धिमत्ता यामधील फरक स्पष्ट करत, म्हणजेच भावनिक समज ही आयुष्यात अधिक महत्त्वाची ठरते, असे प्रतिपादन केले.“ तुम्हाला परीक्षेत यश देतो, पण तुम्हाला माणूस म्हणून घडवतो. संघर्ष, तणाव आणि नातेसंबंधांच्या गुंत्यात असणारी व्यक्ती अधिक सक्षम आणि यशस्वी ठरते,” असे सांगून त्यांनी उपस्थित युवकांना भावनिक समज वाढवण्याचे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिबिर समन्वयक ऍड. दत्तात्रय घोडके यांनी केले. प्रा. संभाजी भोसले यांनी पंचरंग प्रतिष्ठानच्या कार्याची माहिती देत शिबिराची भूमिका विशद केली. प्रमुख पाहुणे तुषार भद्रे यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, “व्यक्तिमत्व विकास ही फक्त करिअरसाठी नव्हे, तर माणूस म्हणून घडण्यासाठीही अत्यावश्यक बाब आहे.“
कार्यक्रमास शिबिर समन्वयक ऍड. दत्तात्रय घोडके, प्रा. डॉ. शिवाजी जेटीथोर, प्रशांत शेटे, ऍड. अक्षय जाधव यांच्यासह पंचरंग प्रतिष्ठानचे सदस्य संतोष शामराज, प्रकाश हुंडेकरी, नारायण नन्नवरे, नरसिंग बोधले, राजेश शिंदे, अनिल रोचकरी, खंडू ताटे सर, महेश धुमाळ, सचिन घोडके, योगेश राऊत, गोपाळ देशमुख, ज्ञानेश्वर माने, प्रा. अनिल काटकर, सचिन साखरे, श्रीशैल हंगरगेकर, विजय माने यांची उपस्थिती लाभली. शिबिरार्थी आणि पालकांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेत, या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.