तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील मौजे कोरेवाडी येथील अवैध दारू व रसायनयुक्त ताडीविक्री धंदा कायमस्वरूपी पुर्णपणे बंद करून विकणा-यावर कारवाई करण्याची मागणी ग्रामपंचायतने ग्रामसभेत ठराव घेऊन केली असतानाही त्याची दखल घेतली जात नसल्यामुळे ग्रामपंचायतने थेट जिल्हाधिकारी यांना निवेदन देवुन मागणी केली आह. जिल्हाधिकारी या प्रकरणाची दखल कशी घेतात याकडे ग्रामस्थांचा नजरा लागल्या आहे.
गट ग्रामपंचायत कदमवाडी ता. तुळजापूरची विशेष ग्रामसभा दि. 22/04/2025 चा ठराव क्र.02 , मौजे कोरेवाडी ता. तुळजापूर जि.धाराशिव येथील सौरभ विकास शिंदे हा गावातील शिवारात देशी दारू, हातभट्टी, विदेशी दारू व रसायनयुक्त ताडी विक्रीचा अवैध धंदा करतो. त्यामुळे गावातील व्यसनाधिनतेचे प्रमाण वाढलेले आहे. गावातील युवकांसह लहान लहान मुलेही व्यसनाधिनतेकडे वळत आहेत. त्यामुळे गावातील अनेक कुटुंबांमध्ये भांडण तंटे वाढत आहेत. शिवाय युवकांकडुन महिलांना मारहाण करणे, कामधंदा न करणे, यामुळे अनेक महिला त्रस्त आहेत. त्यासाठी सदरील दारू व ताडी विक्रीचा अवैध धंदा कायमस्वरूपी बंद करणे बाबत ग्रामपंचायत कदमवाडी ता. तुळजापूरची विशेष ग्रामसभा दि.22/04/2025 ठराव क्र.02 पारीत केलेला आहे. तरी अवैध दारू व रसायनयुक्त ताडी विक्रीचा धंदा कायमस्वरूपी बंद करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करून त्याचा बंदोबस्त करावा अशी विनंती ही ग्रामपंचायत ने केली आहे.