धाराशिव (प्रतिनिधी)- राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त त्यांच्या आजोळ असलेल्या धाराशिव जिल्ह्यातील चोराखळी येथील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या आणि अहिल्यादेवींनी स्वतः स्थापन केलेल्या श्री पापनाश मंदिर परिसरात भाजपच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या उपक्रमात भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, ॲड. नितीन भोसले, खंडेराव चौरे, विकास बारकुल, इंद्रजित देवकते, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, डॉ. गोविंद कोकाटे, मदन बारकुल, दत्तात्रय सोनटक्के, मकरंद पाटील, शिवाजी गिद्दे, खंडेराव मैंदड, सोमनाथ बारकुल हे भाजपचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी यावेळी सांगितले की, “अहिल्यादेवी होळकर यांनी केवळ मंदिर बांधणीच नव्हे तर समाजकारणातही व्यापक योगदान दिले. चोराखळीतील पापनाश मंदिर आजही त्यांच्या सामाजिक दृष्टिकोनाचा साक्षीदार आहे. त्यांच्या त्रिशताब्दी वर्षात या मंदिराचा सन्मान आणि परिसराची स्वच्छता राखणे हे आपले कर्तव्य आहे. या अभियानाच्या माध्यमातून संस्कार, स्वच्छता आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला.

 
Top