धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री ना. छगन भुजबळ यांचा अखिल भारतीय समता परिषद धाराशिव जिल्ह्याच्या वतीने सर्व तालुकाध्यक्ष व पदाधिकाऱ्यानी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीची प्रतिमा कवड्याची माळ व प्रसादरुपी आशीर्वाद देऊन सत्कार करण्यात आला.
मंत्री ना. भुजबळ यांच्या बांद्रा येथील निवासस्थानी झालेल्या या सत्कार समारंभात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद धाराशिवच्या वतीने जिल्ह्यातील कार्याचा आढावा सादर करण्यात आला.
यावेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे मराठवाडा प्रदेश अध्यक्ष आबासाहेब खोत, धाराशिव जिल्हाध्यक्ष विभीषण खुणे, जिल्हा कार्याध्यक्ष संतोष डोरले, कळंब तालुकाध्यक्ष प्रशांत वेदपाठक ,धाराशिव तालुकाध्यक्ष रॉबिन बगाडे, तुळजापूर शहराध्यक्ष मनोज वाघमारे यांच्यासह धाराशिव जिल्ह्यातील अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.