कळंब (प्रतिनिधी)- कळंब तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम उपविभाग हा नेहमिच या- ना त्या कारणाने नेहमी चर्चेत असुन तालुक्यातील सर्वच ग्रामीण रस्त्याचे 'तिन तेरा' वाजलेले आहेत. कुठल्याच रस्त्याकडे संबंधित अधिकारी स्वतः लक्ष देत नसल्याने रस्त्यांची कामे दिरंगाईने निकृष्ट दर्जाची होत असल्याने तालुक्यातील जनता हैराण झाली आहे. त्यामुळे छावा संघटनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या कार्यालयास घातला चपलेचा हार घालण्यात आला.
गेल्या काही महिन्यात तालुक्यातील खामसवाडी-मंगरुळ-पिंपळगाव या सह अनेक गावातील रस्त्याची डागडुजीची कामे झालेली आहेत. परंतु सद्यस्थितीत कामे होऊन देखील सर्व खड्डे मोठया प्रमाणात उखडले आहेत. त्यामुळे केलेली सर्वच कामे हे बोगस झाली असल्याची चर्चा नागरीकांमधुन होत आहे. तर पुन्हा खड्डे दुरुस्ती करावी अशी ही मागणी होत आहे. त्यामुळे अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने वरील सर्व कामांची चौकशी करुन संबंधित गुत्तेदार यांच्यावर कार्यवाही करावी. अशी मागणी सार्वजनिक बांधकाम उपविभागीय अभियंता कळंब यांना दि. 6 मे 2025 रोजी निवेदन देऊन मागणी करण्यात आली होती. या मागणीमध्ये रामगड पाटी, मोहा ते खामसवाडी या रस्त्याचे पॅचवर्कचे काम निकृष्ट दर्जाचे केलेले असुन शासनाने लाखो रुपये पाण्यात गेल्याचे चित्र दिसत आहे.
निवेदनात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला असतानाही कसल्याही प्रकारची दखल घेतली नसल्याने किंवा नोटीस ही दिली नाही. सार्वजनिक बांधकाम उपविभागीय अभियंता यांची भेट घेण्यासाठी गेल्यास उपविभागीय अभियंता हे कार्यालयात उपस्थित नसल्याने दि.20 मे 2025 रोजी त्यांच्या कॅबीनच्या दरवाज्याला चपलांचा हार व दरवाजाला काळे लावून, छावा स्टाईलने आंदोलन करुन घोषणा देण्यात आल्या. या आंदोलनात छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष विठ्ठल यादव, धाराशिव तालुका संघटक अभिषेक गरड, कळंब तालुका विद्यार्थी आघाडी उपाध्यक्ष आदित्य यादव, दिपक वाघमोडे, ज्ञानेश्वर पाटुळे, किशोर कांबळे, रोहन पाटुळे, संतोष ताटे या प्रसंगी उपस्थित होते.