तुळजापूर (प्रतिनिधी)-  भारत-पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेल्या युध्द जन्य परिस्थिती पार्श्वभूमीवर तिर्थक्षेञ तुळजापूरच्या पायथ्याशी असणाऱ्या    सिंदफळ येथील दोन भावंडापैकी मोठा भाऊ सिमेवर लढत असताना सुट्टीवर आलेला धाकटा भाऊ ही सुट्टी अर्धावर सोडुन देशरक्षणासाठी आदेश येताच तात्काळ सिमेवर रवाना झाला.  या दोन जवान भावांना तीन बहीणी आहेत. यांची परिस्थिती बेताची आहे.

तसेच सिंदफळ येथील शशीकांत रघुनाथ कांबळे हा 26 एप्रिल 2025 रोजी सुट्टीवर आला होता. माञ त्याची दोन महिन्याची सुट्टी शिल्लक असताना त्यांना देशरक्षणासाठी बोलवणे येताच ते तीन दिवसापुर्वी थेट सिमेवर जम्मू कश्मीर येथे रवाना झाले. शशीकांत कांबळे यांना दोन मुले असुन चार भाऊ आहेत. वडील वारले असून, घरीची परिस्थिती बेताची आहे. शशीकांत हे पुण्याला होते. माञ आता त्यांची सुट्टी रद्द करुन त्यांना थेट जम्मू कश्मीरला सिमेवर पाठविण्यात आले.

तुळजापूर  तालुक्यातील सिंदफळ  येथील सुरज कुमार दत्ताञय व्यवहारे हे सैन्य दलात हवालदार पोस्टवर कार्यरत असुन ते सध्या कछ भुज येथे कार्यरत आहेत. हवालदार सुरज व्यवहारे यांचे धाकटे बंधु राम दत्ताञय व्यवहारे हे नायक पदावर आहेत.16 एप्रिलला ते वार्षिक सुट्टीवर सिंदफळ येथे गावी आले होते. आणखी  सुट्टी शिल्लक होती. ते आई-वडील पत्नी मुलासह सुट्टीचा आनंद उपभोगत असतानाच अचानक वरिष्ठांचे आदेश तात्काळ कर्तव्यावर हजर होण्यासाठी मिळताच ते तात्काळ अहमदाबादला कर्तव्यावर रवाना झाले. नायक पदावर असलेले राम व्यवहारे यांचे लग्न 2018ला झाले असुन  त्यांना दीड वर्षाचा चिमुकला आहे. 'देशात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे त्यांची सुट्टी रद्द करण्यात आली आहे. यामुळे त्यांनी त्वरित ड्युटीवर हजर राहावे, असा संदेश प्राप्त होताच ते 6 मे 2025 रोजी अहमदाबादकडे रवाना झाले. सद्यस्थितीत देशातील सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक जवानाची उपस्थिती महत्त्वाची ठरत आहे. तुळजापूर तालुक्यातील अनेक गावात सेनेत कुणाचा मुलगा, कुणाचा नवरा, कुणाचा भाऊ तर कुणाचा पिता माञ या युद्ध जन्य परिस्थितीमुळे सारे काही ऐका क्षणात बदलले गेले असुन सध्या सैनिकांचा घरात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

 
Top