कंळब (प्रतिनिधी)- अंनत श्री विभूषीत जगदग़ुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज दक्षिण पीठ नानिजधाम यांचे समस्या मर्गदर्शन व दर्शन सोहळया चे आयोजन बुधवार  दि, 4 व 5 जुन गुरुवार रोजी  सकाळी 9  वाजता श्रीक्षेत्र माऊली माहेर मराठवाड़ा उपपीठ सिमुरगवव्हाण ता. पाथरी  येथे आयोजित  करन्यात आले आहे अशी माहिती मराठवाडा पीठ समितीच्या वतीने देण्यात आलेली आहे. या कार्यक्रमासाठी  मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातील सर्व निरीक्षक जिल्हाध्यक्ष सर्व तालुकाप्रमुख व सतसंग प्रमुख आरती प्रमुख कमिटीतील सदस्य मंडळी व भाविक भक्त यांनी 4 व 5 जुन रोजी जगद्गुरु नरेंद्रचार्य जी महाराज यांचा शुभ आशीर्वाद घेण्यासाठी  उपपीठ मराठवाडा सिमुरगव्हाण मठ तालुका पाथरी जिल्हा परभणी येथे उपस्थित रहावे असे आव्हान मराठवाडा पीठ समितीने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

या ठिकाणी संस्थानाच्या अंधश्रद्धा निर्मूलन उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या अनुषंगाने संस्थानाच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात. जसे की ग्राम स्वच्छता अभियान, शैक्षणिक उपक्रम, वैद्यकीय उपक्रम, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे पुनर्वसन, महिला सक्षमीकरण, आपत्कालीन मदत उपक्रम, कायदेविषयक साक्षरता शिबिरे आयोजित केली जातात.

संस्थानाच्या    उपक्रमांतर्गत ज्या रुग्णांना रक्ताची गरज भासते त्या रुग्णांना त्या हॉस्पिटल येथे जाऊन आज पर्यंत 25,000 रुग्णांना रक्त देऊन प्राण वाचवले आहेत. तसेच 4 जानेवारी 2025 ते 19 जानेवारी 2025 या 15 दिवसात संस्थानामार्फत संपूर्ण महाराष्ट्रात तसेच बाहेरील राज्यात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये एकूण 136247 रक्त कुपिकांचे संकलन करून महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र रक्त संक्रमण परिषदेला सुपूर्द करण्यात आले. तसेच संस्थानाचा मरणोत्तर देहदान हा उपक्रम जनमानसामध्ये अत्यंत प्रभावीपणे यशस्वी होत आहे. सप्टेंबर 2016 ते फेब्रुवारी 2025 या कालावधीत 89 मरणोत्तर देह समाजाच्या सेवेसाठी शासकीय मेडिकल कॉलेजना सुपूर्द करण्यात आले आहेत. महामार्गावरील अपघातग्रस्तांसाठी राज्यातील सहा राष्ट्रीय महामार्गावर 53 रुग्णवाहिका विनामूल्य सेवा करत असून आतापर्यंत 26856 हून अधिक जखमींचे प्राण वाचण्यात यश आले आहे.

दिनांक 4 व 5 जुन 2025 या दोन दिवशी अनंत श्री विभुषित जगदगुरु श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचे अध्यात्मिक अमृततुल्य प्रवचन होणार आहे.

या समस्यामार्गदर्शन व दर्शन सोहळया साठी  मोठ्या संख्यने हजर राहावे ,याच बरोबर मार्गदर्शन व प्रवचन  दर्शन सोहळयासाठी येणाऱ्या भगक्तगंनासाठी दि. 4 जून   पासून येणाऱ्या  सर्व भाविकांसाठी संस्थानामार्फत महाप्रसाद वअन्नदान होणार आहे,असे  अवाहन धाराशिव जिल्हा अध्यक्ष संतोष केसकर व धाराशिव  जिल्हा सेवा समिती चे  प्रसिध्दी प्रमुख विलास मुळीक यांनी केले आहे

 
Top