तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील सामाजिक कार्यकर्ते किरण यादव यांची शहर काँग्रेस उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. सदर निवडीचे पञ काँग्रेस जिल्हाध्यक्ष अँड. धिरज पाटील यांनी दिले. यावेळी अमोल कुतवळ सह पदाधिकारी उपस्थितीत होते.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले  यांच्या आदेशाने व महाराष्ट्र राज्याचे माजी महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी वैद्यकीय शिक्षण

मंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनाखाली आपण काँग्रेस पक्ष वाढीसाठी परिश्रम घ्याल व काँग्रेस पक्षाचे ध्येयधोरण विचार, ग्रामीण भागात तसेच कार्यकर्त्यां पर्यत पोहचवाल अशी अपेक्षा करतो असे नियुक्ती पञात म्हटले आहे.


 
Top