धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानी देविजींच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश,कर्नाटक, तेलंगना व इतर राज्यातून भाविक कुलदेवता असल्याने या ठिकाणी कुलाचार व कुलधर्म करण्यासाठी मोठ्या संख्येने भक्तिभावाने येतात.
श्री देविजीची सिंहासन पुजा ही अत्यंत महत्वाची मानली जाते.ही सिंहासन पुजा नोंदणी ऑनलाईन पध्दतीने श्री.तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या अधिकृत संकेतस्थळावर https://shrituljabhavani.org उपलब्ध करून देण्यात येणार आहे. माहे मे २०२५ मधील सिंहासन पुजा ऑनलाईन पद्धतीने स्विकारण्यात येईल याची सर्व भाविक भक्त,महंत, पुजारी,सेवेकरी व नागरीकांनी नोंद घ्यावी.भाविकांनी सिंहासन पुजा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अधिकृत संकेतस्थळ https://shrituljabhavanitempletrust.org यावर सिंहासन पुजा नोंदणीसाठी भाविकांना उपलब्ध करून देण्यात येत होती. माहे मे २०२५ या महिन्यात सिंहासन पूजेच्या नोंदणीसाठी वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे.भाविकांनी सिंहासन पूजेसाठी http://shrituljabhavanitempletrust.org यावरून सिंहासन पूजा पास बुकिंग या मेन्यूवर क्लीक केल्यानंतर https://shrituljabhavanimataseva. org या लिंकवर प्रवेश करून भाविकांनी आपली सिंहासन पुजेची नोंदणी करावी.
सिंहासन पुजा नोंदणी २१ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १० वाजतापासून सुरू झाली आहे.ती २६ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १० वाजतापर्यंत करता येईल.ऑनलाईन ड्रॉ पध्दतीने प्रथम सोडत व भाविकांना पेमेंटसाठी एसएमएस २७ एप्रिल २०२५ रोजी १०.३० वाजता पाठविण्यात येतील.भाविकांनी प्रथम सोडतीचे ऑनलाईन पेमेंट २७ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजतापासून ते २८ एप्रिलपर्यंत सकाळी १० वाजतापर्यंत करावे.
सिंहासन संख्या पूर्ण न झाल्यास ऑनलाईन ड्रॉ पद्धतीने व्दितीय सोडत व भाविकांना पेमेंटसाठी २८ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजेपर्यंत एसएमएस पाठविण्यात येतील.भाविकांनी व्दितीय सोडतीचे ऑनलाईन पेमेंट २८ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १०.३० ते २९ एप्रिल रोजी सकाळी १० वाजेपर्यंत करावे. प्रथम व व्दितीय फेरीत सिंहासन संख्या पूर्ण न झाल्यास ऑनलाईन ड्रॉ पध्दतीने तृतीय सोडत व भाविकांना पेमेंटसाठी २९ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजतापर्यंत एमएमएस पाठविण्यात येतील.
भाविकांनी तृतीय सोडतीचे ऑनलाईन पेमेंट २९ एप्रिल रोजी सकाळी १०.३० ते ३० एप्रिल रोजी रोजी सकाळी १० वाजतापर्यंत करावे. माहे मे -२०२५ या महिन्यातील अंतीम सिंहासन पुजा बुकींग झाल्याची यादी ३० एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्रसिध्द करण्यात येईल. भाविकांनी वरीलप्रमाणे सिंहासन पुजा नोंदणीचा लाभ घ्यावा.असे आवाहन श्री तुळजाभवानी मंदिर,संस्थान तुळजापूर तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) यांनी केले आहे.