धाराशिव (प्रतिनिधी)-कसबे तडवळे जिल्हा धाराशिव येथील जिल्हा परिषद आदर्श कन्या प्रशाला व जिल्हा परिषद आदर्श केंद्रीय प्रशाला या दोन्ही शाळेच्या विदर्थ्यांनी 18 जानेवारी 2025 रोजी झालेल्या नवोदय प्रवेश परीक्षेत  कन्या शाळा तडवळेच्या आठ विद्यार्थीनींची  तर केंद्रीय प्राथमिक शाळेतील सात विद्यार्थी असे एकूण 15 मुलेमुली यशस्वी झाले आहेत. आज 25 मार्च 2025 रोजी लागलेल्या निकालात कसबे तडवळेच्या दोन्ही जिल्हा परिषद शाळांनी यश संपादन केल्याने सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

यशस्वी विद्यार्थीनी मध्ये जान्हवी संतोष जाधव,गौरवी रामराजे शिनगारे,सोनाली विनोद जाधव,  सई पवन वैद्य,तेजस्विनी किरण राऊत,कार्तिकी शिवानंद पुजारी,श्रावणी दयानंद राऊत,रूचिरा चिंतामणी कावळे तर विध्यार्थी शाळेतील समर्थ सुखदेव घुले,शौर्य भैरीनाथ करंजकर,अथर्व सुहास गरड,अमेय दिलीप घोंगडे,तन्मय दत्तात्रय नेमाने,अक्षय संजय भंडारे व सोहम सुधाकर सुरवसे हे दोन्ही शाळेचे पंधरा विद्यार्थी नवोदय विद्यालय तुळजापूर प्रवेश पात्र झाले आहेत. 

या यशस्वी विद्यार्थींना शाळा स्तरावर कन्या शाळेतील ज्येष्ठ शिक्षक आणि तडवळा पॅटर्नचे जनक जगन्नाथ धायगुडे सर रहिमान सय्यद, शहाजी पुरी,राणी अंधारे,अनिता देशमुख,शीलरक्षा शिंगाडे,संजय देशटवाड,गणपती यावलकर,प्रवीण गाडे,अर्चना यादव,देवेंद्र घायितडक तर केंद्रीय शाळेत बाळासाहेब जमाले, अजय जानराव, दतात्रय मगर, रामकृष्ण ढवळे, अंबिका कोळी,मोहम्मद नदाफ सह मुख्यध्यापक केशव पवार यांचे मार्गदर्शन लाभले.यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे केंद्रप्रमुख जगदीश जाकते व दोन्ही शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. 

सदरील उत्कृष्ट निकालाबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी मैनक घोष, शिक्षण उपसंचालक (विभाग लातूर)  गणपत मोरे , मा.शिक्षणाधिकारी अशोक पाटील, गटशिक्षणाधिकारी असरार सय्यद ,बीट विस्तार अधिकारी श्रीम.किशोरी जोशी मॅडम,केंद्रप्रमुख जगदीश जाकते  ,केंद्रीय मुख्याध्यापक केशव पवार, कन्या शाळा मुख्याध्यापक रहिमान सय्यद शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अमोल पवार व सोमनाथ भोसले यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक व पालकांचे अभिनंदन केले.सत्कार कार्यक्रमावेळी ग्रामपंचायत सदस्य सुभाष धनके,उपाध्यक्षा भाग्यश्री आवटे, देवकन्या जमाले,नीळकंठ पवार व यशस्वी विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.

 
Top