धाराशिव (प्रतिनिधी) - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्यावतीने दोन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आलेले आले असल्याची माहिती रवी सुरवसे यांनी दिली आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दि.9 आणि 10 एप्रिल दरम्यान ही व्याख्यानमाला होणार आहे. दि. 9 एप्रिल रोजी 'डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण विषयक विचार' या विषयावर प्राचार्य डॉ.नागोराव कुंभार हे विचार व्यक्त करणार आहेत आहेत. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ विचारवंत पन्नालाल सुराणा हे भूषविणार आहेत. तर दि. 10 एप्रिल रोजी 'संविधानाची 75 वर्षे : वाटचाल, सद्यस्थिती व भवितव्य' या विषयावर ॲड. जयमंगल धनराज हे आपले विचार व्यक्त करणार आहेत. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रा.डॉ. मनोहर सिरसाट हे भूषवणार आहेत. कार्यक्रमाचे आयोजन धाराशिव शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौकातील सोनाई फंक्शन हॉल येथे दररोज सायंकाळी 6 वाजता करण्यात होणार आहे. त्यामुळे या व्याख्यानमालेचा लाभ सर्वानी घ्यावा, असे आवाहन विचार मंचचे अध्यक्ष प्रा. सुरवसे यांनी केले आहे.