तुळजापूर (प्रतिनिधी)-  महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्रीतुळजाभवानी मातेचे दर्शन घेवुन मंदीर जिर्णोध्दार कामांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस हे शनिवार दि. 29 मार्च रोजी तिर्थक्षेञ तुळजापूरला आले होते. यावेळी त्यांनी मंदीराची जवळपास अर्धा तास पाहणी केली. तिर्थक्षेञ तुळजापूरात आगमन होताच थेट मंदीरात दाखल झाले. प्रथम त्यांनी श्रीगोमुख तिर्थकुंड पाहणी केली असता आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी हे काशीचे पाणी श्रीगोमुख रुपातुन मंदिरात आल्याचे सांगितले. नंतर मंदीरातील उजव्या सोंडेचा सिध्दीविनायकचे दर्शन घेतले. तेथुन ते होमकुंडा जवळ आल्यावर पाटील यांनी येथे होमहवन होते सांगितल्यानंतर पिंपळ पार दाखवला. तेथुन थेट देविजींचा मुख गर्भगृहात गेल्यानंतर प्रथम श्रीतुळजाभवानी मातेचे दर्शन करुन मनोभावे पुजा केली. नंतर त्यांनी गर्भगृहाततील तडा गेलेल्या शिळा खाली आधारसाठी लावलेले छोटे राँड पाहुन येथे हे कशासाठी लावले असे विचारणा केली. देविचे महंत तुकोजी  व आमदार पाटील यांनी  गर्भगृहातील तडे गेलेल्या शिळा  दाखवल्या हे पाहुन  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आश्चर्य चकीत झाले व अरे बाप रे म्हणत  देविमुर्ती सुरक्षा व भक्तांची सोय या दोन महत्त्वाचा गोष्टींना प्राधान्य देणे गरजेचे असल्याचे पाहणी दरम्यान म्हणाले. 

नंतर सिंह गाभाऱ्यातील मोर खालील शिळ दाखवली असता मंदीर मोठे असणे गरजेचे असल्याचे म्हणाले. तेथुन ते सिंह गाभारा पाहणी केल्यानंतर भवानीशंकर मंडपात येवुन भवानी शंकरचे दर्शन घेतले. भवानी शंकर बद्दल महती सांगताना महंत तुकोजी बुवा म्हणाले, शंकर हे शिव भवानी हे शक्ती स्थान असल्याने हे स्थान शिवशक्ति असल्याचे मुख्यमंत्री यांना सांगितले. छञपती शिवाजी महाराज दरवाजा मधुन खालील भागाची पाहणी केली. यावेळी जिथे 108 फुट भवानी तलवार देतानाचे शिल्प उभारावयाचे ते ठिकाणासह संपुर्ण करण्यात येणाऱ्या विकास कामांची सविस्तर माहीती सुमारे अर्धा तास दिली. यावेळी श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थान अध्यक्ष तथा जिल्हाअधिकारी किर्ती किरण पुजार, विश्वस्त तथा उपविभागीय अधिकारी अरुणा गायकवाड, तहसिलदार तथा व्यवस्थापक प्रशाषण अरविंद बोळगे, पुरातत्व विभागाचे संचालक  आमदार अभिमन्यु पवार, सुनिल चव्हाण, सचिन रोचकर, अधिकारी, मंदीर कर्मचारी मोठ्या संखेने उपस्थितीत होते.

 
Top