तुळजापूर (प्रतिनिधी) - गुडीपाडव्या दिनी रविवार दि. 30 मार्च रोजी पहाटे देवीजींचे चरणतीर्थ झाल्यानंतर मंदिराच्या शिखरावर महंत तुकोजीबुवा, महंत वाकोजी बुवा यांनी देविजींच्या गाभाऱ्यावर असणाऱ्या शिखरावर गुढी उभारण्यात आली. नंतर गुढीचे पुजन करुन आरती करण्यात आली. श्रीतुळजाभवानी मातेस दहीदुध पंचामृतअभिषेक पुजा करण्यात आली. त्यानंतर संपुर्ण शिवकालीन सुवर्ण घालण्यात आले. आज हिंदू सवंत्सराचा प्रथम दिन पार्श्वभूमीवर आज श्रीतुळजाभवानी दर्शनार्थ भक्तंनी गर्दी केली होती. आज पाडवा वाचन करण्यात आले. ज्यामध्ये वर्षभराच्या धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन सांगितले गेले. राञी मंदीर प्रांगणात देविजींचा छबिना काढण्यात आला.
गुढ्या उभारण्याऐवजी घरावर भगवे ध्वज !
गुढी पाडवा पार्श्वभूमीवर पुर्वी घरावर लुगडे, पालथा तांब्या, लिंबाचे पाने असलेली गुढी उभारली जात होती. यंदा माञ बहुतांशी घरावर छञपती शिवाजी महाराज प्रतिमा असलेले भगवे ध्वज गुढी ऐवजी उभारल्याचे दिसुन आले.