तुळजापूर (प्रतिनिधी)-   श्रीतुळजाभवानी  मंदीर संस्थान अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी किर्तीकिरण  पुजार यांनी शुक्रवार दि. 14 मार्च रोजी सुट्टी दिनी तिर्थक्षेञ तुळजापूरात येवुन मंदीर परिसर, बसस्थानक, भवानीतिर्थ कुंड, सुविधा केंद्र जिथे निर्माण करावयाचे आहे ते ठिकाण सह धर्मशाळा आदी ठिकाणची भरउन्हात पाच तास पाहणी केली. यावेळी विविध ठिकाणी संबधितांना सुचना दिल्या.

यावेळी त्यांचा सोबत तहसिलदार तथा व्यवस्थापक प्रशासन अरविंद बोळगे, मुख्याधिकारी लक्षमण कुंभार, धार्मिक व्यवस्थापक अमोल भोसले. अभियंता राजकुमार भोसले सह संबंधित विभागाचे प्रमुख यावेळी उपस्थितीत होते.

प्रथमता श्रीतुळजाभवानी दर्शन घेवुन पाहणी करण्यास सुरूवात केली. मंदीर परिसरात चालु असलेल्या जिर्णोध्दार कामाची पाहणी केली. नंतर मातंगी मंदीर तेथुन हाडको भागात जावुन सुविधा केंद्र निर्माण करायाचे आहेत त्या भागाची पाहणी केली. 124 धर्मशाळा पाहुन लातुर रस्त्यावर येवुन बसस्थानक पाहणी केली. प्रवाशांनी पाणी स्वछता बाबतीत विचारणा केली असता पाणी लांबुन आणावे लागते असे सांगताच जवळ पाणी सोय करण्याचा सुचना दिल्या. तेथुन शासकीय गोदावुन पाहणी करुन महामार्ग लातुर रस्त्यावर सर्व्हिस रस्ता बाबतीत पाहणी केली व लवकर सर्व्हिस रस्ता प्रश्न मार्गी लावण्याचा सुचना दिल्या. नंतर 108 धर्मशाळा पाहणी केल्यानंतर भवानी तिर्थकुंडाची पाहणी केली.

 
Top