भूम (प्रतिनिधी)- येथील प्राईड इंग्लिश स्कूल मध्ये स्वयंशासन दिन साजरा करण्यात आला. अमान कुरेशी हा मुख्याध्यापक तर राजनंदिनी हिवरे हिने उपमुख्याध्यापक म्हणून शालेय कामकाज आणि एक दिवसीय प्रशासन चालवले. प्राईड इंग्लिश स्कूलच्या युकेजी वर्गाच्या विद्यार्थ्यांच्या वतीने स्वयंशासन दिनाचे आयोजन केले होते. 

विद्यार्थ्यांचा स्वयंशासन दिनातील सहभाग हा केवळ शिक्षक होण्याचा अनुभव देणारा नसून, भविष्याला आकार देणारी रूची, कला दर्शविणारे एक प्रतीक असते. प्राचार्य, शिक्षक, लिपीक, सेवक व विद्यार्थी यांच्या तांत्रिक सुसंवादाची जाणीव निर्माण होते. स्वयंशासन हा एकदिवसीय अनुभव अन्‌‍ आनंद वाढवणारा असतो. तसेच भविष्यात यशाची दिशादर्शक ठरतो म्हणून विद्यार्थी ही आठवण आयुष्यभर जपतो. यावेळी कृष्णा बागडे हा पर्यवेक्षक बनला होता. तर इतर विद्याथ्यांनी शिक्षक म्हणून कार्य पार पाडले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेघा सुपेकर, दिपीका टकले, भाग्यश्री डांगे यांच्यासह आशा म्हेत्रे व अरुणा बोत्रे यांनी परिश्रम घेतले.


 
Top