धाराशिव (प्रतिनिधी)- उमरगा तालुक्यातील तुरोरी येथे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य अँड व्यंकटराव गुंड यांच्या प्रमुख उपस्थितीत बूथ समिती अध्यक्ष बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये नवीन बूथ अध्यक्ष यांना निवडीचे पत्र देऊन सत्कार करून पक्ष संघटन वाढविण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या बैठकीमध्ये युवराज सुरेश जाधव, बालाजी विश्वनाथ माणिकवार, पंडित शंकरराव शिंदे, शशिकांत भाऊराव बाळेकर, भरत रावसाहेब जाधव, ज्ञानेश्वर दाजी पाटील या नवीन सहा बूथ अध्यक्ष यांची निवड करण्यात आली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष माधव पवार, तालुकाध्यक्ष शहाजी पाटील, उद्योग आघाडीचे श्रीकांत मीणियार, विकास जाधव, ग्राम समिती अध्यक्ष भगवान शिंदे, शाहूराज भोसले, चैतन्य स्वामी,सचिन जाधव,दिलीप भुसारे, बळीराम जाधव, पवन शहापूरे, नंदकिशोर पाटील, दयानंद मंडले, चैतन्य सूर्यवंशी, अशोक बिराजदार इतर पदाधिकारी, कार्यकर्ते व गावकरी उपस्थित होते.