धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील अधिपरिचारिका पुरुष (ब्रदर) पदावर असणारे छत्रपाल युवराज वाघमारे यांची राज्य सहकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र राज्याच्या धाराशिव तालुका कार्यकारिणी समन्वयक पदी निवड झाल्याबद्दल रुग्ण कल्याण समिती व इथिकल कमिटीच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करुन भावी कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

तर अधिसेविका संगिता फड चिरके यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा ही दिल्या. यावेळी रुग्ण कल्याण समिती सदस्य अब्दुल लतिफ,शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय धाराशिव ईथिकल कमिटी सदस्य गणेश वाघमारे,आरोग्य मित्र शेख रऊफ ब्रदर,नेत्र तज्ञ डॉ. बाळासाहेब घाडगे, ब्रदर किरण गरड,सिस्टर गवई, सुमित्रा गोरे,दिघे सिस्टर सह सिस्टर कर्मचारी अन्य उपस्थित होते.


 
Top