तुळजापूर (प्रतिनिधी)- राष्ट्रीय कार्याध्यक्ष व संसद रत्न खासदार सुप्रिया ताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये फळ वाटप चा कार्यक्रम करण्यात आला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार धनंजय पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा निमंत्रक अनिल शिंदे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष अमरनाथ चोपदार, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष शरद जगदाळे, राष्ट्रवादीचे सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष आकाश शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सामाजिक न्याय विभागाचे तालुका उपाध्यक्ष दयानंद गवळी, राष्ट्रवादी युवक तालुका उपाध्यक्ष समाधान देवगुंडे, गणेश ननवरे, खंडू जाधव इतर सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top