भूम (प्रतिनिधी)-भूम येथील शंकरराव पाटील कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बारावी परीक्षेत यश मिळवले आहे. यामध्ये  विज्ञान शाखा 91.71 टक्के वाणिज्य शाखा 76.19 टक्के, कला शाखा 63.06 टक्के, एकूण प्रविष्ट विद्यार्थी 331, उत्तीर्ण 262. एकूण निकाल 79.15 टक्के लागला आहे.

विशेष प्राविण्य मिळवलेले विद्यार्थी पुढील प्रमाणे. विज्ञान शाखा- प्रथम क्रमांक शेख अहमद लालू 79 टक्के, द्वितीय क्रमांक कुमारी डोंबाळे साक्षी तुकाराम 71.67 टक्के, तृतीय क्रमांक कुमारी पाठमास अश्विनी रामेश्वर 70.50 टक्के. वाणिज्य शाखा- प्रथम क्रमांक कुमारी आसलकर अनुष्का संदीप 79.17 टक्के, द्वितीय क्रमांक कुमारी तांबे प्रतीक्षा परमेश्वर 69.17 टक्के, तृतीय क्रमांक लोंढे चैतन्य सुनील 69 टक्के.  कला शाखा - प्रथम क्रमांक नागटिळक औदुंबर अरुण 77 टक्के,  द्वितीय क्रमांक कुमारी मुंडेकर सोनाली बाळासाहेब 74.50 टक्के, तृतीय क्रमांक कुमारी खटाळ राणी मोहन 72.50 टक्के. या सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाकडून हार्दिक अभिनंदन करण्यात आले.

 
Top