तुळजापूर (प्रतिनिधी) - शहरासह परिसरात गुरुवार दि. 10 रोजी राञी झालेल्या वादळवाऱ्यासह परिसराला झोडपुन काढले. राञी जवळपास पाऊन तास धुवादार पावसाने झोडपुन काढले. तर पिंपळाखुर्द परिसरातील शेतातील विद्युत पोल, शेतातील शेड व जनावरांच्या कोट्यांवरील पञे उडुन गेले. या वादळवाऱ्याचा फटका प्रामुख्याने शेतकऱ्यांना बसला.
यात वादळ वाऱ्यात झाडाला लागलेला आंबा मोठ्या प्रमाणात पडला. वृक्षाचे फाटे ही या वादळवाऱ्यात जमिनीवर मोठ्या प्रमाणात पडले. यात विज वितरणाचे मोठे नुकसान झाले. गुरुवार सांयकाळी साडेपाच वाजता वादळवाऱ्यास आरंभ झाला. पाऊस कमी पण वादळवारे मोठ्या प्रमाणात चालु झाल्याने यात आंबा मोठ्या प्रमाणात गळून पडला. काढलेल्या ज्वारीचे मोठे नुकसान झाले. या वादळवाऱ्यात शेतातील कोटे व शेडवरील पञे उडुन गेले. पोल जमिनीवर आडवे पडले. यात शेतीचे मोठे नुकसान झाले. सुमारे पाऊन तास हे वादळवारे होते. या वादळवाऱ्यासह झालेला पाऊस दुष्काळात तेरावा महिना ठरला.