उमरगा (प्रतिनिधी)-आई होणे, आपल्याला एक गोंडस बाळ असणे. आपण त्याला वाढवून मोठे करणे हे प्रत्येक स्त्रीचे स्वप्न असते. जेंव्हा तंत्रज्ञान विकसित नव्हते तेव्हा यावर उपाय म्हणून अशा स्त्रिया मुल दत्तक घेण्याला प्राधान्य द्यायची. पण त्यातून स्वतःच्या गर्भाशयात बाळ वाढवण्याची भावना मिळायची नाही. पण जसं जसं तंत्रज्ञान विकसित होऊ लागलं तसं तस समस्यावर संशोधन केले जाऊ लागले आणि शेवटी शास्त्रज्ञांनी चमत्कार घडवत नैसर्गिक रित्या त्या आई होऊ न शकणाऱ्या स्त्रियांना सुद्धा आई बनण्याचा उपचार शोध लागला. ती उपचार प्रक्रिया म्हणजे आयव्हीएफ“ अशी प्रतिक्रिया स्त्री रोग तज्ञ व कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ. माया कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

उमरगा उमरगा शहरातच प्रथमच समर्थ आईवीएफ, संभाजीनगर यांच्या 14 वी शाखा उमरगा येथील पतंगे हॉस्पिटल येथे सुरुवात करण्यात आली. त्याप्रसंगी उदघाटक म्हणून सौ माया कुलकर्णी बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानज्योती संस्थेच्या अध्यक्षा आकांक्षा चौगुले होत्या. प्रमुख पाहुणे म्हूणन महाराष्ट्र स्त्रीरोग संघटनेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्रसिंह परदेशी, भारताच्या स्त्री रोग संघटनेचे उपाध्यक्ष डॉक्टर अजय माने. डॉ. दामोदर पतंगे, किरण गायकवाड, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर विनोद जाधव, आयएमएचे अध्यक्ष डॉ. अनंत मुगळे, डॉ. दीपा मोरे, व्यापारी महासंघाचे माजी अध्यक्ष सिद्रामप्पा चिंचोळे, समर्थ आयव्हीएफचे संचालक डॉ. अतिष लड्डा, डॉ. सौ. हर्षलाता लड्डा, हरिप्रसाद चांडक, सौ. उज्वला चांडक, डॉ. सागर पतंगे, डॉ. सौ. अंबिका पतंगे आदी यावेळी उपस्थित होते. 

पुढे बोलताना डॉ. कुलकर्णी म्हणाल्या, जगातील सर्वात उदात्य भावना म्हणजे मातृत्व, मातृत्व दोन प्रकारचे एक भावनिक व दुसरे जैविक. भावनिक मातृत्व साधुसंतांमध्ये आढळून येते म्हणून म्हणून संत ज्ञानेश्वरांना आपण माऊली म्हणतो व दीनदुबळ्यांची सेवा करणाऱ्या संत पदवीला पोहोचलेल्या मदर टेरेसा या भावनिक मातृचे उत्तम उदाहरण आहे. जैविक मातृत्वाची आशा सर्व स्त्रियांना असते की नैसर्गिक भावना आहे तिच्या मधल्या स्त्रीला पूर्णत्व येणे हे हे मातृत्व आहे जर निसर्गाने स्त्रीच्या मातृत्व किंवा पुरुषांच्या पालकत्व काही अडचण निर्माण केली तर ती दूर करण्यासाठी आयव्हीएफ या उपचार पद्धती शोध लागला.

यावेळी बोलताना डॉ. परदेशी म्हणाले, माता मृत्यू व स्त्री आरोग्य या देशाच्या प्रगतीचे मानक असते जागतिक आरोग्य संघटनेने माता मृत्यूवर 2030 पर्यंत जर एक लाख माता मागे 70 च्या आत असावा असे सांगितले आहे. आज भारताचा दर 97 आहे तर अभिमानाने सांगतो की महाराष्ट्राचा माता मृत्यू दर 33 आहे. शासनाने डॉक्टरांच्या उपचारावरील  कर कमी केल्यास सवलतीत उपचार करता येईल. 

यावेळी डॉ. अजय माने, डॉ. हर्षलता लड्डा डॉ. आतिश लड्डा, डॉ. दीपा मोरे, किरण गायकवाड आदींनी मनोगत व्यक्त करून आकांक्षा चौगुले यांनी अध्यक्षीय समारोप केले. यावेळी ॲड. प्रदीप शहा,  डॉ. एम एस आडवाणी, डॉ. सुभाष वाघमोडे, डॉ. दत्तात्रय थिटे, ॲड.  नंदकिशोर अग्रवाल, डॉ. उदय मोरे, ऍड. प्रवीण तोतला, भगवान पुरी  प्रभाकर हिरवे, बलभीमराव पाटील, प्राचार्य डॉ. दिलीप कुलकर्णी, प्राचार्य शिवानंद बुदले, मुख्याध्यापक सुभाष साखरे, प्राचार्य डॉ. श्रीकांत गायकवाड, नितीन होळे, रत्नाकर पतंगे, मदन गोजे, सौ. गायत्री गोजे आदीं मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ. अंबिका पतंगे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. अभयकुमार हिरास यांनी केले. तर डॉ. सागर पतंगे यांनी आभार मानले.


 
Top