तेर (,प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील दूरक्षेत्र येथे पोलिसांनी फुलवली आहे फुल व फळबाग.

धाराशिव तालुक्यातील तेर येथे दूरक्षेत्र परीसरात स्वच्छता करून ,खड्डे खणून विविध प्रकारचे फळ व फुल झाडे लावली आहेत.वृक्षवली आम्हा सोयरे याप्रमाणे तेर येथील तेर दुरक्षेत्र येथील सहायक पोलिस उपनिरीक्षक सुहास गवळी,बिट अंमलदार प्रदिप मुरळीकर,पो ना.प्रकाश तरटे,पो.अ.महेश पाडे यांनी परिश्रम करून फुल व फळबाग लागवड केलेली आहे.


 
Top