धारशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात 75 वा प्रजासत्ताक दिन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात साजरा करण्यात आला.

सर्वप्रथम शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे आणि संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांच्या पुतळ्याला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. राष्ट्रध्वज तिरंगा मा. प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या शुभहस्ते फडकवून राष्ट्रीय छात्रसेनेकडून राष्ट्रीय ध्वजाला व महाविद्यालयाचे प्राचार्य यांना मानवंदना देण्यात आली.

याप्रसंगी राज्यशास्त्र विभागाकडून तयार करण्यात आलेल्या भितीपत्रिकेचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी विद्यापीठातील प्रोफेसर डॉ. डी के गायकवाड उपस्थित होते. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.


 
Top