परंडा (प्रतिनिधी) - आ.गोपीचंद पडळकर यांच्यावर चप्पल फेकल्याच्या निषेधार्थ बुधवार दि.13 डिसेंबर रोजी धनगर समाजाच्यावतीने आयोजित परंडा शहर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 

परंडा शहरातून समाजाच्या वतीने रॅली काढण्यात आली. यावेळी युवक व समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आ. गोपीचंद पडळकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा यावेळी निषेध करण्यात आला. दरम्यान परंडा शहर व परिसरातील सर्व व्यापारी प्रतिष्ठाने बंद राहिली. शहर परिसरात बंदला चांगला प्रतिसाद मिळाला.तर शासकीय निमशासकीय कार्यालये सुरळीतपणे चालू होते. धनगर समाजाच्यावतीने तहसीलदार कार्यालयात निवेदन देण्यात आले. यावेळी आ.पडळकर यांची सुरक्षा वाढवण्यात यावी अशी मागणी दिलेल्या निवेदनात करण्यात आली.  


 
Top