धाराशिव (प्रतिनधी)-ओबीसी समाजाच्या आणि विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी ओबीसी, व्हीजेएनटी, एससी, एसटी बहुजन परिषदेच्या वतीने सोमवारी (दि.9) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले. 

ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे, बिहार राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात जातनिहाय जनगणना करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, कंत्राटीकरणं आणि खाजगीकरणाचा शासन निर्णय रद्द करावा, राज्यातील 62 हजार शाळा खाजगी कंपन्याना न देता शासनाकडेच ठेवाव्यात, मंडल आयोगाची 100 टक्के तात्काळ अंमलबजावणी करावी, बिहार राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी, ओबीसींना पदोन्नतीत आरक्षण द्यावे,  ओबीसींचा नोकरीतील अनुशेष भरून काढावा, नॉन क्रिमी लेअरची अट रद्द करावी अथवा त्यामध्ये दरवर्षी नियमित मर्यादा वाढवावी, महाज्योतीसह ओबीसी प्रवर्गाच्या महामंडळाचा अध्यादेश व संचालकांच्या नेमणुका तात्काळ करण्यात याव्या, जिल्हास्तरावर ओबीसी मुले व मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह सुरू करावेत, ओबीसी विद्यार्थ्यांची सर्व फीस शासनाने भरावी, ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत महागाई दरानुसार वाढ करावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. 

यावेळी ओबीसी, व्हीजेएनटी बहुजन परीषदेचे संयोजक धनंजय शिंगाडे,पांडुरंग कुंभार,रवि कोरे आळणीकर,लक्ष्मण माने,भालचंद्र हुच्चे ,दीपक जाधव ,दौलतराव गाढवे,तानाजी माळी,कल्याण कुंभार,किशकिंदा पांचाळ, अभिजित गिरी,महादेव खटावकर,आबासाहेब खोत,सतिश कदम, इंद्रजित देवकते, दत्ता सोनटक्के,ञ्यंबक कचरे,शिवानंद कथले, सुनील अप्पा शेरखाने,मौलाना अलीम, बाबा मुजावर, दताऋय सरपे,इर्शाद कुरेशी ,प्रेमचंद गोरे,अतुल लोहार,अहेमद मुजावर,खलिल सय्यद, फेरोज पल्ला, कृष्णा भोसले, इल्यास मुजावर, मैत्रीदीप कांबळे, रोहित काटेकर, विलास सरपे,  लक्ष्मण सरपे, दत्तात्रे सरपे, पांडुरंग लोकरे, अभिजीत गीरी, अंकुश पेठे, अमजद खान, दीपक जाधव, सुनील गोसावी यांच्यासह जिल्हाभरातून महिला पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


 
Top