धाराशिव (ंप्रतिनिधी)- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून 2 ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जातो. यावर्षी स्वच्छ भारत दिवसाच्या निमित्ताने 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2023 या कालावधीत “कचरामुक्त भारत“ थीम असलेला स्वच्छता ही सेवा उपक्रम स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) व शहरी यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे.त्याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान महोदय यांच्या आवाहनानुसार आज एक ऑक्टोबर रोजी जिल्हयातील प्रत्येक गावात व्यापक स्वरूपात 01 ऑक्टोबर, 10.00 वाजता, 01 तास स्वच्छतेसाठी श्रमदान आयोजित करण्यात आले होते. यानिमित्ताने जिल्हास्तरावर जिल्हा परिषद इमारत परिसरात ही स्वच्छतेसाठी श्रमदान आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे हे उपस्थित राहून स्वच्छतेसाठी श्रमदान मोहिमेत सहभागी झाले. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांचे संकल्पनेतून स्वच्छ भारत मिशन टप्पा दोन अंतर्गत घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनासाठी तयार करण्यात आलेल्या निर्देशांकाचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी बोलताना खंदारे म्हणाले की, स्वच्छता ही सेवा उपक्रमातुन गावात शाश्वत स्वच्छता टिकुन राहणेसाठी प्रयत्न केले जात असुन, गावात शाश्वत स्वच्छता राहणेसाठी प्रत्येकांनी आपले घर व परिसर स्वच्छ ठेवावा आणि स्वच्छतेच्या उपक्रमांतुन स्वच्छता चळवळ घराघरात पोहचली पाहिजे, जन आंदोलन उभे राहिले पाहिजे याकरिता ही मोहिम हाती घेण्यात आली आहे.यातुन योजनेचे अंतिम ध्येय साध्य करावे जेणेकरुन गावात शाश्वत स्वच्छता राहणेस मदत होऊ शकेल तसेच गाव हाणदारीमुक्त अधिक होणेसाठी वैयक्तिक शौचालयाच नियमित वापर, सार्वजनिक स्वच्छकतागृहाचा वापर, वैयक्तिक व सार्वजनिक स्तरावर घनकचरा व सांडपाणी व्य्वस्थापन प्रकल्पातुन सांडपाणी, ओला व सुका कचरा, प्लावस्टिक कचरा व्यावस्थापन याविषयी गुणवत्तापुर्ण उपाययोजना गावात निर्माण कराव्यात असे ते बोलत होते.
जिल्हास्तरीय कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य् कार्यकारी अधिकारी विलास जाधव, प्रकल्प संचालिका श्रीमती प्रांजल शेिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शाम गोडभरले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.भागवत ढवळशंख, उपमुख्यं कार्यकारी अधिकारी डि.एम.गिरी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतिश हरिदास, कार्यकारी अभियंता संजय ढवळे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कुलदिप मिटकरी,उपशिक्षणाधिकारी (प्रा.) शिवाजी फाटक यांचे सह जिल्ह्ा परिषदेतील सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी सहभागी होते.
आज जिल्ह्यातील 720 गावांमध्य्े गावात रस्त्याच्या कडेची स्वच्छता, पानवटे, झोपडपट्ट्या, बाजाराची ठिकाणे, प्रार्थना स्थळे, सार्वजनिक आणि खाजगी कार्यालयांच्या आजूबाजूंचे परिसर, पर्यटकांची ठिकाणे, बस स्थानक, आरोग्य संस्था आणि लगतचे क्षेत्र, अंगणवाड्या भोवतीची स्वच्छता, शाळा आणि महाविद्यालयांच्या आसपासची परिसर स्वच्छता अशा ठिकाणी स्वच्छतेसाठी श्रमदान करण्यात आले आहे.श्रमदान झालेनंतर उपक्रमांचे फोटो पोर्टलवर अपलोड करण्यात आले आहे. तसेच या स्वच्छतेसाठी श्रमदान उपक्रमावेळी ग्रामस्थांनी स्वच्छतेबाबत शपथ घेतली.
गोवर्धनवाडी ता.धाराशिव येथे 01 ऑक्टोबर, 10.00 वाजता, 01 तास स्वच्छतेसाठी श्रमदान मोहिमेत जिल्हा परिषेदेच्या प्रकल्प संचालिका श्रीमती प्रांजल शेिंदे, विभागीय आयुक्त कार्यालयातील गट विकास अधिकारी श्री.आर.एस.महाजन व पाणी पुरवठा व स्व च्छ,ता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.भागवत ढवळशंख यांनी सहभाग नोंदवून ग्रामस्थांसोबत श्रमदान केले.यावेळी नागरिक व महिला मोठया संख्येने सहभागी झाले होते.