तुळजापूर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेञ तुळजापूर येथे विकास कामांचा आरंभ झाला असून, येथील बसस्थानक अतिशय अद्ययावत उभारले जाणार आहे. या बसस्थानकासाठी 3.61 कोटी रुपये मंजुर झाले असले तरी यात आणखीन भर घातली जाणार आहे असे प्रतिपादन आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी केले.
तिर्थक्षेञ तुळजापूर येथील जुन्या बसस्थानकाच्या जागी नव्याने उभारण्यात येणार्या नवीन बसस्थानकाचा रविवार दि. 30 जुलै रोजी आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते भूमिपुजन सोहळा संपन्न झाला. याप्रसगी नगराध्यक्ष सचिन रोचकरी युवानेते विनोद गंगणे उस्मानाबाद जिल्हा मजूर फेडरशन चेअरमन नारायन नन्नवरे, नगराध्यक्ष सचिन रोचकरी, दुधसंघ चेअरमन बाळासाहेब शिंदे, राजसिंह निंबाळकर, आनंद कंदले, विक्रमसिंह देशमुख, शांताराम पेंदे, नागेश नाईक, पंडीत जगदाळे, किशोर साठे, राजेश्वर कदम, अनिल पाटील, सचिन शेट्टी,उबाळे किशोर, नितीन रोचकरी, सुहास सांळुके अदि उपस्थितीत होते. या कार्यक्रमाचे सुञसंचलन प्रकाश मगर यांनी केले. तर आभार राजेश्वर कदम यांनी मानले. यावेळी शहरातील नागरीक प्रवाशी एसटी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.