तुळजापूर (प्रतिनिधी)-  श्री तुळजाभवानी मातेचे पुरातण प्राचीन मौल्यवान सोनेचांदी दागदागिन्यांची पुर्न मोजणी करण्याचे आदेश श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांनी दिले असुन या संदर्भाची प्रक्रिया मंगळवार दि 25 जुलैपासुन प्रथम बैठक होवुन प्रारंभ होणार असल्याचे वृत्त आहे. श्री तुळजाभवानी मातेच्या पुरातण ऐतिहासिक वस्तुची मोजदाद समिती नेमुन करुन सवीस पानी अहवाल जिल्हाधिकारी यांच्या कडे नुकताच सादर करण्यात आला होता. माञ या अहवालात अनेक पुरातन दागदागिने बाबतीत सविस्तर माहिती नसल्याने देविच्या अतिप्राचीन अशा सात डब्यातील सुवर्ण अलंकार मोजदाद करण्याचे आदेश दिले आहेत. 

यासाठी उपविभागीय अधिकारी उमरगा यांच्या अध्यक्षतेखाली अकरा सदस्यांची समिती गठीत केली असुन यात सोनार, प्रेमनाथ प्रमाकर झाड, गुलाम रब्बानी गुलाम जिलानी, अंबुलगे नागेश, उमरगा सहाय्यक धर्मादाय आयुक्त प्रतिनिधी, उस्मानाबाद लेखाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद महंत चिलोजी बुवा, गुरु हमरोजी बुवा, महंत तुकोजी बुवा, गुरु बजाजी, पाळीकर  भोपे उपाध्य  पुजारी मंडळ, सदस्य यांची नियुक्ती केली केली आहे.

पुर्वी फक्त वस्तुची मोजदाद करण्यात आली होती आता कशा पध्दतीने मोजदाद होणार हे लवकरच कळणार आहे.

 
Top