उस्मानाबाद चे ग्रामदैवत असलेले श्री कपालेश्वर मंदिर हे उत्तर चालुक्य कालीन असल्याचे पुरावे मिळत आहेत, या मंदिरात तसेच जुन्या गावात  द्वारशाखा, स्तभं, वीरगळ, सर्प यज्ञनोपवित असलेला गणपती, सरस्वतीचे शिल्प, सप्त मातृका, शिवपार्वती, भैरव इ. गाजमुर्ती इ. मुर्त्या सापडल्या आहेत. या मूर्त्यांची शिल्प शास्त्रानुसार किंवा वैशिष्टया नुसार हा काळ उत्तर चालुक्य कालीन ठरतो, भोगावती नदीच्या काठावर असलेले सुंदर असे हे मंदिर हा पुरातन वारसा सांगत आहे, सध्या या मंदिराची पुनर्बांधणी झाली आहे, त्याही आधी हे मंदिर पुण्यश्लोक अहिल्यामाई यांनी बांधले असावे असा येथील मंदिराचा गाभारा पहिल्या वर वाटते  सध्या नवीन बांधकामामुळे इथे शिलालेख वगैरे काही मिळत नाही, आपल्या शहरात एखादी जागा किंवा हॉल नगर परिषेदेने दिली तर खूप ऐहित्यसिक ठेवा आपणास तिथे ठेवता येईल, या मुर्त्या ऊन वारा पाऊस झेलत तिथेच पडल्या आहेत. उस्मानाबाद शहर परिसरात श्री कपालेश्वर, पापनाश, चक्रतीर्थ, राजे बाग, नागनाथ ( कपिलधार ) इ ठिकाणी शिव मंदिरे आहेत.

                                  -  जयराज खोचरे - पुरातत्व व इतिहास

 
Top