उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेअंतर्गत पोर्टलवरील नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांपैकी ज्या पात्र लाभार्थ्याची ई-केवायसी पूर्ण झालेली नाही, अशा सर्व शिल्लक पात्र लाभार्थ्यांची 100 टक्के ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व संबंधित तहसिलदार यांच्या अधिनस्त सर्व गावांमध्ये दि. 23, 24 आणि 25 जानेवारी, 2023 रोजी विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व संबंधित तहसिलदार यांच्या अधिनस्त असलेले सर्व तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांना त्यांच्याकडे नेमून दिलेल्या गावांमध्ये उपस्थित राहून ज्या पात्र लाभार्थ्याची ई-केवायसी करणे प्रलंबित आहेत, अशा सर्व लाभार्थ्याना ई-केवायसी करुन घेण्यासाठी आदेशित करण्यात आले आहे.

  जिल्हयातील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेअंतर्गत पोर्टलवरील नोंदणीकृत ज्या पात्र लाभार्थ्यांचे ई-केवायसी पूर्ण करण्याची कार्यवाही प्रलंबित आहे, अशा सर्व लाभार्थ्यांनी दि. 23, 24 आणि 25 जानेवारी, 2023 रोजी आयोजित करण्यात आलेल्या विशेष कॅम्पमध्ये आधारकार्डच्या प्रतीसह उपस्थित राहून ई-केवायसी कार्यवाही पूर्ण करुन घ्यावी. जे लाभार्थी त्यांचे ई-केवायसी ची कार्यवाही पूर्ण करणार नाहीत, अशा लाभार्थ्यांना 13 व्या हप्त्यापासून वंचित रहावे लागेल, असे जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी केले आहे.


 
Top