उस्मानाबाद / प्रतिनिधी-

राज्याचे आरोग्यमंत्री तथा उस्मानाबादचे पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांची बदनामी केल्याप्रकरणी 4 जणावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

उस्मानाबाद जिल्ह्यातील भुम पोलिस ठाण्यात बदनामीकारक मजकूर सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्याविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. सावंत यांच्या नावाचा वापर करून बदनामीकारक सोशल मीडियावर पोस्ट केल्या गेल्या व त्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे भुम तालुका प्रमुख बालाजी गुंजाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हे गुन्हा उस्मानाबाद सायबर विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 67 सह इतर कलमाने गुन्हा नोंद करण्यात आला आहे

 
Top