उस्मानाबाद / प्रतिनिधी-

केंद्र शासन व जागतिक बँक यांच्या संयुक्त विद्यमाने अटल भूजल योजना जलसुरक्षा आराखडा अंमलबजावणी या विषयावर एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम दि. 12-12-2022 रोजी  यशवंतराव चव्हाण सभागृह, जि.प. उस्मानाबाद येथे घेण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे उदघाटक मा श्री. शिवकुमार स्वामी निवासी उपजिल्हाधिकारी, उस्मानाबाद, श्रीमती. प्रांजल शिंदे, प्रकल्प संचालक , जि. ग्रा. वि.यं. तथा प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सह अध्यक्ष जिल्हास्तरीय नियोजन व समन्वय समिती, अटल भूजल योजना जि.प. उस्मानाबाद, श्री. रमेश पेठकर राज्य प्रकल्प व्यवस्थापन कक्ष (SPMU), आयुक्त कार्यालय, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, पुणे, श्री एस बी गायकवाड वरिष्ठ भूवैज्ञानिक, श्रीमती डॉ.मेघा शिंदे सहा. भूवैज्ञानिक यांच्या हस्ते दिपप्रज्वलन व कलश पूजन करुन प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन करणेत आले.

    कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत भूजलाच्या अनियंत्रीत उपशामुळे होत असलेली भूजल पातळीतील घसरण थांबविणेकरीता केंद्र शासन व जागतिक बँक पुरस्कृत अटल भुजल (अटल जल) योजना राबविण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. योजना पुर्णत:  केंद्र शासन व जागतीक बँक पुरस्कृत असुन प्रकल्प क्षेत्रातील 55 गावांमध्ये मागणी आधारित (पाणी बचतीच्या उपाययोजना) कामे व पुरवठा आधारित (जलसंधारण पुनर्भरण उपाययोजना) वेगवेगळया विभागाच्या जसे की मनरेगा, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम, जलसंधारण, इत्यादी योजनेद्वारे अभिसरण (Convergence) करण्यात येणार आहे. तसेच  भूजल गुणवत्ता सुधारणे किंवा अबादित राखणे. मागणी आधारीत (पाणी बचतीचे उपाय योजना) व पुरवठा आधारीत (जलसंधारण व भुजल पुर्नभरण) व्यवस्थापनाच्या सुत्राचा अवलंब करुन भुजल साठयात शाश्वता आणणे. भूजल पातळीची घसरण थांबविणे व पाणी गुपवत्तां सुधारणा करणे. सद्यस्थितीत कार्यान्वित असलेल्या केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत योजना जसे की मनरेगा, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन इत्यादी च्या माध्यमातुन होत असलेल्या गुंतवणुकीमध्ये एककेंद्रभिमुखता (Convergence) साध्य करणे. जलसंपदा विभाग, कृषि विभाग, भूजल पुर्नभरण, रोजगार हमी योजना, विहिर पुर्नभरण,बंधारे  शोषखडडे यांची कामे प्राधान्याने राबविणे. भुजलाच्या शाश्वत विकासाकरिता जिल्हा व ग्राम पातळीवर सक्षम संस्थात्मक व्यवस्था निर्माण करणे.सुक्ष्म सिंचन पदतीचा अधिकाधिक अवलंब करुन उपलब्ध पाण्याचा वापर मर्यादित करणे. सिंचन व्यवस्थापनामध्ये सुधारणा आणणे व सर्व बागायती क्षेत्रात 100 टक्के ठिंबक व तूषार सिंचना खाली आणणे. आदी विषयाची माहिती सादरीकरणा दवारे  श्री. रमेश पेटकर जलसंधारण तज्ञ, राज्य प्रकल्प व्यवस्थापन कक्ष (SPMU), आयुक्त कार्यालय भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, पुणे यांनी दिली.

 तसेच प्रगतशील शेतकरी प्रशांत माने रा. खामसवाडी ता. जि. उस्मानाबाद यांनी ड्रगन फ्रुट फळबाग शेती बदल माहिती दिली तर श्री. नाईकनवरे यांनी मुरघास व शेळी पालन यांची देवून व्यवसाय आणि शेतकऱ्यांनी कमी पाण्यामध्ये जास्त उत्पादन व उत्पन्न मिळणाऱ्या पिकांची लागवड करावी याबदल माहिती दिली. 

 अटल भूजल योजनेचा प्रचार व प्रसिध्दी होणेसाठी शालेय विविध स्पर्धाचे आयोजन करणेत येत आहे. काही गावांपैकी जि.प.प्राथमिक शाळा बावी ता.जि. उस्मानाबाद येथे आयोजित करणेत आलेल्या विविध स्पर्धेतील विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण करणेत आले. तसेच गावात निवड करणेत आलेल्या भूजल मित्र यांना ओळखपत्राचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करणेत आले. 

 अटल भूजल योजनेची जिल्हास्तरावर तयार करणेत आलेल्या माहिती पुस्तीकेचे विमोचन मान्यवरांच्या हास्ते करणेत आले. यावेळी जल प्रतिज्ञा उपस्थित सर्व प्रशिक्षणार्थी कडून जल प्रतिज्ञा घेण्यात आली. 

श्रीमती. प्रांजल शिंदे, प्रकल्प संचालक , जि. ग्रा. वि.यं. तथा प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सह अध्यक्ष जिल्हास्तरीय नियोजन व समन्वय समिती, अटल भूजल योजना जि.प. उस्मानाबाद, यांनी आपल्या 

मार्गदर्शनपर भाषणात अटल भूजल योजनेंर्गत करणेत येणाऱ्या कामा बदल समाधान व्यक्त केले. यांनी आपल्या मार्गदर्शनात विविध विभागाच्या कामाबाबत बोलण्यात आले.  पाण्याबदल जागृता करुन पुढील पिढीसाठी पाण्याचा काटकसरणे वापर करणे, जास्त पाणी लागणाऱ्या पिका ऐवजी पर्याय म्हणून कमी पाणी लागणारी पिके घ्यावीत जेणे करुन पाण्याची बचत होईल. तसेच लहान शेतकऱ्यांसाठी शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यान पर्यत पोहचव्यात याबाबत मार्गदर्शन केले.

      अटल भूजल योजनेत समाविष्ठ 55 गावात सर्व शासकिय योजना राबविणेसाठी विविध विभागातील अधिकारी यांनी आपल्या विभागाच्या योजनाची माहिती सादरीकरणाच्या माध्यमातून प्रशिक्षणा दरम्यान दिली यामध्ये श्री एम डी तिर्थकर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रेशीम उद्योग विभागाकडून श्रीमती. वाकुरे मॅडम, दिपक क्षिरसागर जिल्हा पशुसंवर्धन विभाग, श्री. आर आर चोबे सामाजिक वनीकरण, मृद व जलसंधारण विभाग, श्री. वैशाली घुगे सकाळ फौंडेशन, श्री.चादरे सर टाटा सामाजिक विज्ञान संस्था, तुळजापूर, श्री. अभिजित कवठेकर वॉटर संस्था, श्री. सचिन सूर्यवंशी ज्ञान प्रबाधनी सामाजिक संस्था, एस एस पी सामाजिक संस्था श्री खोत कावळेवाडी आदीनी मार्गदर्शन केले.

 सदर  प्रशिक्षण कार्यक्रमाला विविध विभागाचे 95 प्रशिक्षणार्थी उपस्थित होते या जिल्हास्तरीय प्रशिक्षणत खूप मोठ्या प्रमाणावर यशस्वी सहभाग मिळाला .         कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. क्रांतिवीर पवार वरिष्ठ लिपिक, श्री.आर बी शेटे क. भूवैज्ञानिक, श्रीमती डोंगरे मॅडम, श्रीमती गुरवे मॅडम श्री. श्री काळे सर श्री. गेंडले सर, ब्रम्हदेव माने  माहिती शिक्षण संवाद तज्ञ , हिंदुराव काबुगडे कृषी तज्ञ, वैभव गायकवाड जलसंधारण तज्ञ, अमोल बाराते लेखा सहाय्यक, श्री.प्रथमेश राठोड संगणक चालक, कर्मचारी भू.स.वि.यं उस्मानाबाद, हरिभाऊ नाईक IEC Expert, रियाज पठाण लातूर DPMU व जिल्हा अमंलबजावणी भागीदारी संस्था DIP अध्यक्ष, समन्वयक सर्व तज्ञ, समुदाय संघटक यांनी प्रयत्न केले तर सूत्रसंचालन डॉ मेघा शिंदे सहा.भूवैज्ञानिक यांनी केले व आभार प्रदर्शन श्री एस.बी. गायकवाड वरिष्ठ भूवैज्ञानिक भू.स.वि.यंत्रणा उस्मानाबाद यांनी मानले

 
Top