उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

 गवळी गल्लीतील प्राध्यापक गजानन गवळी यांच्या खास भेटीसाठी कोल्हापूर जिल्हा असोसिएशनचे अध्यक्ष व यांच्या मुली व मुलांच्या 30 खेळाडू चमूने निवासस्थानी जाऊन भेट व आशीर्वाद घेतले. गुरु व शिष्याची भेट व सर्व खेळाडूंचे स्वागत उस्मानाबाद येथे झालेल्या खेळांच्या स्पर्धेच्या वेळी कोल्हापूर जिल्हा असोसिएशनचे अध्यक्ष राजन उरुणकर यांनी भेट घडवून आणली. त्यांनी भारतीय पातळीवरील व राज्य पातळीवरील खेळाडू पंधरा महिला व पंधरा पुरुष , मार्गदर्शक व फिजिओथेरपी श्री व सौ त्याचप्रमाणे संघ व्यवस्थापक  सर्वांना घेऊन इचलकरंजीतील एकेकाळी खेळाचे गुरु व खेळाची प्रेरणा,प्रोत्साहन विविध  मार्गदर्शन करणारे 1972 ते 1990 या कालावधीमध्ये फिजिकल डायरेक्टर म्हणून महाविद्यालयांमध्ये काम केलेले व सेवानिवृत्त झालेले प्राध्यापक गजानन गवळी यांच्या भेटीसाठी खास निवासी येऊन त्यांचा मान  सन्मान व गौरव या सर्व शिष्यांनी केला .

यावेळी प्राध्यापक गजानन गवळी यांनी चॅलेंजर्स स्पोर्ट्स क्लब , श्री बाल हनुमान गणेश मंडळ, जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशन, शिवछत्रपती पुरस्कार व गुणवंत कामगार पुरस्कार प्रतिष्ठानच्या वतीने गवळी गल्लीतील मानाचा गणपती व धाराशिव चा महाराजा येथे या 30 40 खेळाडू मार्गदर्शकांचा शेला, सन्मानचिन्ह,  श्री ची प्रतिमा व सन्मानपत्र देऊन सत्कार सर्वांचा करण्याचा मनमत पाळणे ,राजकुमार दिवटे, काशिनाथ दिवटे शिवछत्रपती व गुणवंत कामगार  पुरस्कारस्ते, संजय पाळणे मुकुंद घुले , नंदकुमार  हुच्चे  विद्या साखरे  श्रीकांत दिवटे  आकाश महामुनी ,सापते, तीर्थकर, राहुल गवळी , सौ. अलका गवळी सुरेखा,ज्योती,मनिषा इत्यादीने मुलींचा व मुलांच्या खेळाडूंचा सन्मान व सत्कार करून सर्वांना अल्पोपहाराचाआस्वाद दिला. खेळाडू मार्गदर्शक यांनी आपल्या प्रतिक्रिया गुरुबद्दल व मंडळाबद्दल व्यक्त केल्या यामधील प्राध्यापक गवळी व कोल्हापूर जिल्हा असोसिएशनचे अध्यक्ष उरुणकर यांनी प्राध्यापक गजानन गवळी यांच्या 15 ते 20 वर्षाच्या कालावधीतील विविध आठवणी व खेळासाठी विविध मार्गदर्शन सोयीसुविधा याविषयी त्या काळातील केलेली व दिलेली सेवा यांचा उल्लेख करून आजही खेळाडू वृत्ती व खेळ जोपासला आहे ते या सत्कार व सन्मानातून दिसत आहे. मनमत पाळणे यांनी आपल्या पश्चिम महाराष्ट्रात व्हॉलीबॉल खेळांच्या स्पर्धेसाठी चॅलेंजर्स स्पोर्ट्स क्लब हा सातत्याने विजय व उपविजेतेपद किंवा पराभूत जरी झाला असला तरी तेथील माणसांनी दिलेले प्रेम,  स्नेह दाखवलेला खिलाडूपणा हा फार मोठा त्या काळातील व प्रतिकूल परिस्थितीवर मात करून व्हॉलीबॉल चा खेळ कौशल्यपूर्ण टिकून ठेवला आहे हे आठवणीने सांगण्याचा प्रयत्न केला.गवळी गल्लीतील तरुण  व्हॉलीबॉल व लेझीम खेळासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवपूर्ण आहे. गाठीभेटीतून पश्चिम महाराष्ट्रातील व मराठवाडय़ातील संस्कार, देवाणघेवाण, आगळीवेगळी भेटीत आठवण  स्नेह वाढविण्याचा प्रयत्न यातून केला गेला आहे .अत्यंत आनंदाचा क्षण असे म्हटले आहे या कार्यक्रमाचे संचलन मा. प्राचार्य भालचंद्र हुच्चे यांनी केले व राजकुमार दिवटे यांनी आभार मानले. या कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेशाच्या व श्री तुळजाभवानी मातेच्या पूजेने व विविध प्रकारच्या मंत्र उच्चार व आरतीने करण्यात आले.समारोप आई राजा उदो उदो, बोल भवानी की जय, गणपती बाप्पा मोरया, भारत माता की जय, वंदे मातरम अशा विविध आनंंदमय घोषणांनी  समारोप केला. 

 
Top