तुळजापूर / प्रतिनिधी-

 ज्येष्ठ नागरिकांना स्मार्टकार्ड प्राप्त करून घेण्यासाठी १३/३/२०२३ पर्यत मुदतवाढ  देण्यात आली आहे. 

 रा . प . महामंडळाव्दारे विविध सामाजिक घटकांना विद्यार्थी , ज्येष्ठ नागरिक , पत्रकार , विविध पुरस्कारार्थी यांना स्मार्टकार्ड देण्यात येत आहे . दि . ३१.०८.२०२२ ते दि .० ९ .० ९ .२०२२ या कालावधीत गणेशोत्सव असल्याने तसेच दिवाळीच्या कालावधीत ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होऊ नये व ज्येष्ठ नागरिकांच्या येत असलेल्या मुदतवाढीच्या मागणीच्या अनुषंगाने ज्येष्ठ नागरिकांचे स्मार्टकार्ड . नोंदणीकरण व वितरणं ( Issuance ) करणेसाठी वरील संदर्भिय पत्राव्दारे दि . ३१.१०.२०२२ पर्यंत . मुदत वाढ देण्यात आली आहे . परंतू सद्यस्थितीत स्मार्टकार्ड कार्यप्रणालीच्या काही तांत्रिक अडचणींमुळे स्मार्टकार्ड नोंदणीकरण प्रक्रिया बंद असून केवळ स्मार्टकार्ड नुतनीकरण व स्मार्टकार्ड टॉपअप प्रक्रिया सुरु आहे . सबब , ज्येष्ठ नागरिकांचे स्मार्टकार्ड नोंदणीकरण व वितरण ( Issuance ) करणेसाठी दि . ३१.०३.२०२३ पर्यंत मुदत वाढ देण्यात येत आहे . त्यानुसार विभागांना पुढीलप्रमाणे सुचना देण्यात आल्या आहेत  

 ज्येष्ठ नागरिक यांस स्मार्टकार्ड प्राप्त करुन घेण्यासाठी दि .३१.०३.२०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे . २. तसेच आगारातील ज्येष्ठ नागरिकांची स्मार्टकार्ड तातडीने संबंधितांस वितरीत करण्याबाबत व आगारात कोणत्याही लाभार्थ्याचे स्मार्टकार्ड शिल्लक राहणार नाही अशा सुचना आगार व्यवस्थापक यांना देण्यात आली.


 
Top