उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

सिंधफळ तालुका तुळजापुर येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला कठोर शिक्षा करण्यात यावी या मागणीचे निवेदन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा मा. सौ. रुपालिताई चाकणकर यांना भारतीय मराठा महासंघाच्या वतीने देण्यात आले.

निवेदन देताना भारतीय मराठा महासंघाच्या धाराशिव जिल्हा प्रमुख मा.संकेत  सुर्यवंशी, जिल्हा युवती अध्यक्षा कु. शिवलीलाताई कानडे,जिल्हा कार्याध्यक्ष मा. सूनीलजी फंड, जिल्हा प्रवक्ता मा.खंडू भाऊ राऊत, महिला जिल्हा उप अध्यक्षा मा. शारदा ताई मोटे, शहराध्यक्षा सौ. पुष्पाताई शिंदे, जिल्हा युवती उप अध्यक्षा कु. वैष्णवी लकडे, महिला जिल्हा कार्यकारणी सदस्य मा. संगीता अतकरे, मा. पायल पवार,वर्षा कुदळे, सुलक्षणा मोरे उपस्थित होत्या

 
Top