नळदुर्ग / प्रतिनिधी-

नळदुर्ग येथील श्री क्षेत्र रामतीर्थ जवळील रामडोह धबधबा सध्या ओसंडुन वाहत असुन हा धबधबा सुरू झाल्याने हा सुंदर क्षण पाहण्यासाठी सध्या पर्यटक व रामभक्तांची याठिकाणी मोठी गर्दी होत आहे.

  सध्या नळदुर्ग शहर व परीसरात दमदार पाऊस पडत आहे. या पावसामुळे बोरी धरण १०० टक्के भरले असुन या धरणाच्या सांडव्यातुन मोठ्याप्रमाणात पाणी वाहत आहे. त्यामुळे बोरीनदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. बोरी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने या नदीच्या पाण्यावर अवलंबुन असलेले ऐतिहासिक किल्ल्यातील नर--मादी व शिलक धबधब्यासह श्री क्षेत्र रामतीर्थ जवळील रामडोह धबधबाही सध्या जोरदारपणे ओसंडुन वाहत आहे. रामडोह वाहत असताना पाहणे म्हणजे डोळ्याचे पारणे फेडुन घेण्यासारखे आहे.

 “रामडोह” धबधब्याला मोठा प्राचिन इतिहास आहे. श्री क्षेत्र रामतीर्थ येथे श्री प्रभु रामचंद्र वास्तव्याला असतांना श्री प्रभु रामचंद्रांनी याच रामडोहात स्नानकेल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे या रामडोहाला अनन्यसाधारण असे महत्व आहे.त्यामुळे श्री क्षेत्र रामतीर्थ येथे श्री प्रभु रामचंद्रांच्या दर्शनासाठी येणारा प्रत्येक रामभक्त हा या डोहाकडे जातो. सध्या हा रामडोह मोठ्याप्रमाणात ओसंडुन वाहत आहे. हा धबधबा सुरू झाल्यानंतर या धबधब्यातुन खाली कोसळणारे पाणी पाहण्याचा एक मोठा आनंद आहे.  हा रामडोह धबधबा सुरू झाला असल्याने हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटक तसेच याठिकाणी मोठी गर्दी करीत आहेत.


 
Top