उस्मानाबाद /प्रतिनिधी-

जिवे मारण्याचा प्रयत्न करणा-या दोघांना  5 वर्षे सक्तमजुर व प्रत्येकी 5 हजार रू. दंडाची शिक्षा मे. जिल्ह व सत्र न्यायालय-1, उस्मानाबाद यांनी ठोठावली आहे.

 सदर प्रकरणाची अतिरीक्त शासकीय अभियोक्ता  पंडीत के. जाधव यांनी सांगीतलेली हकीकत थोडक्यात खालीलप्रमाणे

तकारदार जगन्नाथ सटवा मस्के यांनी दि. 12 मार्च 2012 रोजी पोलीस स्टेशन तुळजापूर येथे तकार दिली की, दि. 11 मार्च 2012 रोजी संध्याकाळी 10 च्या सुमारास फिर्यादी जगन्नाथ व त्याचे भाउ रघुनाथ सोमनाथ पुतण्या अजित व आई राहीबाई मस्के (सर्व रा. तडवळा )असे घराजवळ असताना गावातील दिलीप काशिनाथ चंदनशिवे, झुंबर, संदिपान, सतिष, अजित, बाबसाहेब, आकाश व धनंजय ( सर्व राहणार तडवळा ता. तुळजापूर ) यांनी शिविगाळ करून त्यांच्या हातातील काठयांनी फिर्यादी व त्यांच्या भावांना व आईस जिवे मारण्याच्या उददेशाने मारहाण केली. सदरील मारहाणीत सोमनाथ सटवा मस्के व रघुनाथ सटवा मस्के हे गंभीर जखमी झाले. त्यांना पुढील उपचारासाठी तुळजापूर व तेथून आश्विनी हॉस्पिटल, सोलापूर येथे हालविण्यात आले होते.

सदरील प्रकरणात फिर्यादी व आरोपी यांच्या मध्ये परस्परांविरूध्द तुळजापूर पो. स्टे. येथे गुन्हे दाखल झालेले होते. सदरील प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने एकून 19 साक्षीदाराच्या साक्ष - नोंदविण्यात आलेल्या होत्या. सदरील प्रकरणात वैद्यकीय पुरावा तसेच केमिकल विश्लेषण अहवाल व साक्षीदारांचा पुरावा मे. न्यायालयाने विचारात घेवून एकून सात आरोपीपैकी दोन आरोपी दिलीप काशिनाथ चंदणशिवे व धनंजय संदिपान चंदनशिवे यांच्या विरूध्द सरकार पक्षाचा पुरावा निसंशयी ग्राहय धरून त्यांना मे. जिल्ह व सत्र न्यायालय-1, उस्मानाबाद यांनी त्यांना 5 वर्षे सक्तमजुरीची व प्रत्येकी 5 हजार रू. दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

अभियोग पक्षातर्फे अतिरीक्त शासकीय अभियोक्ता पंडीत के. जाधव यांनी काम पाहिले. तसेच त्यांना कोर्ट पैरवी श्रीमती वाघमारे   यांनी केली.

 
Top