वाशी / प्रतिनिधी-

विश्व जन आरोग्य सेवा समिती, महाराष्ट्र राज्य (उस्मानाबाद) यांनी कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे व प्रजासत्ताक दिनांचे औचित्य साधून जिल्हा समन्वयक  सोमनाथ कोकाटे यांनी तहसील कार्यालय वाशी येथे  रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले होते. सदर रक्तदान शिबिराचे उद्घाटन श्री. नरसिंग जाधव, तहसीलदार वाशी यांचे हस्ते व सौ.रुपाली बाबासाहेब घोलप, सभापती, पंचायत समिती वाशी व  नामदेव राजगुरू, गट विकास अधिकारी वाशी यांचे उपस्थितीत करण्यात आले. 

 शिबीरात श्री.नरसिंग जाधव,  तहसीलदार वाशी,  रुपाली बाबासाहेब घोलप, सभापती, पंचायत समिती व  प्रवीण देशमुख, ग्रामसेवक यांनी रक्तदान केले व तदनंतर तहसील कार्यालय वाशी तसेच गट विकास अधिकारी वाशी कार्यालयातील कार्यालयीन तसेच क्षेत्रीय अधिकारी कर्मचारी यांनी रक्तदान केले. सदर शिबीरामधे एकूण 51 रक्तदात्यांनी रक्तदान केलेले आहे.सदर शिबीरादरम्यान श्रीमती अहिल्या गाठाळ,  उपविभागीय अधिकारी कळंब यांनी भेट दिली.भगवंत रक्त पेढी बार्शी जिल्हा सोलापूर चे कार्यकारी अधिकारी गणेश जगदाळे व त्यांचे सहकारी यांनी रक्त संकलन केले.


 
Top