उस्मानाबाद / प्रतिनिधी-

मौलाना अब्दुल कलाम आझाद उर्दू प्रायमरी हायस्कूल खाजा नगर उस्मानाबाद तर्फे ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त कार्यक्रमात  अप्पती व्यवस्थापन अधिकारी सौ.वृषाली तिलोरे व आप्पती व्यवस्थापन शोध व बचावकार्य टीम मधील पोलीस अझहर काझी ,अनिरुद्ध कावळे,मुजीब पल्ला,यासीन सय्यद,भाऊसाहेब आडे,प्रमोद मुंडे, यांनी मांजरा नदीच्या पुरात अडकलेले अठरा जणाचा जीव वाचवल्याबद्दल त्यांचा सत्कार शाळेच्या वतीने प्रमुख पाहुण्याच्या हस्ते करण्यात आला .

या कार्यक्रमास उस्मानाबाद शहरातील प्रथम नागरिक नगराध्यक्ष मकरनद  राजे निंबाळकर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉक्टर प्रताप सिंह भैय्या पाटील काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा प्रगती पतसंस्थेचे चेअरमन प्रशांत नानासाहेब पाटील  काँग्रेसचे शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे शिवसेनेचे शहराध्यक्ष पप्पू भैया मुंडे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष नितीन भैया तावडे  अध्यक्ष शशिकांत खूननं  साहेब  नितीन शेरखाने युवा अध्यक्ष महाराष्ट्र राष्ट्रीय  चर्मकार महासंघ  शिवानंद कतले अध्यक्ष वीर्शैव जंगम मठ डॉक्टर रुपेश कुमार  बहुसंख्याक प्रतिष्ठित नागरिक  पालक  उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक मौलाना अबुल कलाम आझाद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मौलाना अलिमुद्दिन यांनी केली तसेच आभार प्रदर्शन इफतेखार पटेल सर यांनी केले  व्याख्यान कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक यांनी परिश्रम घेतले.


 
Top