तेर/प्रतिनिधी

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील तेरणा नदीच्या दोन्ही तिरावर दगडी घाट बांधण्याची मागणी तेर येथील अजित कदम यांनी बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे देश-परदेशातील पर्यटक ,अभ्यासक, भक्तगण मोठ्या संख्येने येत असतात . तेर येथील श्री संत गोरोबा काका मंदिर ते नृसिंह मंदिरापर्यंत तेरणा नदीच्या दोन्ही तिरावर दगडी घाट बांधकाम करण्यात यावा तसेच या दगडी घाट बांधकामासाठी विशेष निधी मंजूर करण्याची मागणी तेर येथील अजित कदम यांनी राज्याचे बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

 
Top