तेर /  प्रतिनिधी

 राष्ट्रीय क्रिडा दिनानिमित्त राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करुन गावाचे नावलौकिक मिळवून देणाऱ्या तेर (ता. उस्मानाबाद) येथे महाराष्ट्र संत विद्यालयात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा राष्ट्रीय क्रिडा दिनानिमित्त मुख्याध्यापक एस .एस. बळवंतराव यांच्या मार्गदर्शनाखाली सहशिक्षक महादेव भंडारे , सुर्यकांत खटिंग , क्रीडा मार्गदर्शक हरी खोटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडू पृथ्वीराज साळुंखे , राष्ट्रीय खेळाडू प्रणिता जाधवर , विराज जाधवर आदि खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.


 
Top