परंडा / प्रतिनिधी -

 कै.वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त पंचायत समिती परंडा येथे कृषी दिन साजरा करण्यात आला.यावेळी कृषी संजीवनी विशेष २०२० रब्बी हंगाम राज्यस्थरीय पीक स्पर्धा आणि कृषी संजीवनी मोहीम आयोजित पुरस्कार विजेते यांचा सन्मान करून नियोजित कार्यक्रम संपन्न झाला. 

यावेळी उपस्थित गट विकास अधिकारी  किशोर अंधारे, कृषी अधिकारी महारूद्र मोरे, सभापती अनुजा दैन, गोविंद जाधव, मा.सरपंच विश्वास मोरे, प.स.सदस्य अॅड अमोल करळे, पोपट चोबे, सहाय्यक गट विकास अधिकारी आर.राठोड,  वि.अ.कृ. एस.बोडके, कृ.अ. नलवडे व्ही.डी, म.अ. के.देवकर, म.अ.तावरे एम.आर, कृषी सहाय्यक बी. कोकाटे, कृ.स.डी.गोडगे,आत्मा चे व्यवस्थापक पाटील ए.आर., कृ.अ.देवकर पी.एम, कृ.स. जी डी कुलकर्णी, कृ.स.यादव , कृ.स.पाटील,  बागायतदार विकास थिटे, आबाराव चव्हाण आदी शेतकरी उपस्थित होते.

 
Top