उस्मानाबाद / प्रतिनिधी-

टाकळी (बें) (ता.उस्मानाबाद) येथील उध्‍दव यशवंत लांडगे यांच्या घरासमोरील  जागेमध्‍ये जप्त केलेला एकूण तेरा ब्रास वाळूसाठयाचा जाहीर लिलाव मौजे.टाकळी (बें) येथे दि.07 जुलै-2021 रोजी सकाळी 11.00 वाजता आयोजित करण्यात आला आहे.

  या लिलावामध्ये वाळूस 3199 रुपये प्रतीब्रास या दराने 41587 रुपये (अक्षरी एकेचाळीस हजार पाचशे सत्‍याएैंशी  रुपये मात्र) एवढी हातची किंमत धरुन टाकळी येथे जाहीर लिलावाव्दारे विक्री करण्यात येणार आहे.या लिलावाच्या सर्वोच्च बोलीच्या रक्कमेवर 10 टक्के अतिरिक्त रक्कम जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी म्हणून लिलावधारकाकडून शासनजमा करणे बंधनकारक राहील,असे उस्मानाबाद तहसीलदार गणेश माळी यांनी कळविले आहे.

 या वाळुसाठयाचा लिलाव करण्यास अपर जिल्हाधिकारी यांनी परवानगी दिली आहे.उपविभागीय अधिकारी उस्‍मानाबाद यांनी उस्मानाबाद तहसीलदार यांना प्राधिकृत केले आहे. या प्रकरणात खाण व खनिज अधिनियम 1951 व महाराष्‍ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 48 (7) प्रमाणे कार्यवाही करणे आवश्‍यक आहे. जप्त केलेल्या वाळूचा लिलाव वाळू/रेती निर्गती सुधारीत धोरण शासन निर्णय क्र.गौखनि-10/0219/ प्र.क्र.09/ख-01 दिनांक-03 सप्टेंबर-2019 मधील मुद्दा क्र.XX (03) मध्ये अवैध उत्खनन व वाहतूक कारवाईत जप्त वाळूरेती साठयाच्या/विल्हेवाटीबाबत अनुसरावयाची कार्यपध्दतीनुसार करणे आवश्यक आहे.

  याबाबत कोणत्याही प्रकारचा हितसंबंध, हक्क असणाऱ्या व्यक्तीचा सदरच्या लिलावास काही आक्षेप/उजर/तक्रार इत्यादी असल्यास दि.04 जुलै-2021 च्या आत लेखी स्वरुपात या  तहसील कार्यालयास कागदोपत्री पुराव्यासह सादर करावा.विहीत मुदतीत कुणाचा आक्षेप/उजर/तक्रार इ. प्राप्त न झाल्यास या लिलावास कुणाचाही आक्षेप नाही, असे समजण्यात येऊन नियमाप्रमाणे पुढील कार्यवाही करण्यात येईल, तसेच विहीत मुदतीनंतर आलेले आक्षेप/उजर/तक्रार इ. विचारात घेतले जाणार नाहीत,असेही आवाहन तहसीलदार गणेश माळी यांनी केले.


 
Top