उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

उस्मानाबाद येथील डॉ.वेदप्रकाश पाटील शैक्षणिक संकुल,गडपाटी आळणी येथील अध्यापक महाविद्यालयात कार्य करीत असलेल्या प्रा.सुकेशनी गव्हाणे-मातने यांनी डिसेंबर२०२० च्या सेट परीक्षेत यश प्राप्त करत ही परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्या अध्यापक विद्यालय व महाविद्यालयात गेल्या बारा वर्षापासून कार्यरत असून त्यांनी यापूर्वीही अनेक परीक्षेत यश मिळविले आहे. डिसेंबर २०२० मध्ये  झालेल्या सेट परीक्षेत शिक्षणशास्त्र या विषयातून त्या उत्तीर्ण झाल्या आहेत. 

या यशाबद्दल वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणीचे माजी कुलगुरू डॉ.वेदप्रकाश पाटील व धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ.प्रताप सिंह पाटील, परभणीचे आमदार डॉ.राहूल पाटील संस्थेचे सचिव डॉ.उदयसिंह पाटील,प्राचार्य कैलास मोटे प्राचार्य सतीश मातने यांनी त्यांचे या यशाबद्दल अभिनंदन केले आहे.


 
Top