उस्मानाबाद / प्रतिनिधी-

गेल्या काही दिवसांपासून शासकीय व खाजगी रुग्णालयात ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. उस्मानाबाद शहरातील जिल्हा रुग्णालयात आँक्सीजन बेड उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांनी आमदार कैलास पाटिल यांच्याकडे तक्रार केली होती. दरम्यान तात्काळ संवेदनशिल आमदार पाटिल यांनी उस्मानाबादच्या जिल्हा रुग्णालयात धाव घेऊन रुग्णालयातील प्रशासनाच्या आधीकार्यांना ताबडतोब बोलावले व लागलीच जिल्हा रुग्णालयाच्या जवळच असलेल्या नेत्र रुग्णालयातील शिल्लक ४० बेड होते त्या बेडवर आँक्सीजनची व्यवस्था करुन रुग्णांना ते बेडही लगेच उपलब्ध करुन दिले.त्यामुळे रुग्णांची होणारी हेळसांड आमदार कैलास पाटलांच्या  प्रयत्नामुळे थांबली. 

सध्या आमदार कैलास पाटिल हे उस्मानाबादेतच ठाण मांडून बसलेले आहेत उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व आरोग्य विभागासोबत ते वेळोवेळी सुचना देऊन दुरध्वनीवरुन आढावा घेत आहेत दरम्यान त्यांनी काल उस्मानाबाद व कळंब येथील रुग्णालयाला भेट देऊन आरोग्य विभाला रुग्णांची काळजी घेण्याच्या सुचना दिल्या.   सध्या रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे नागरीकांनी विनाकराण घराच्या बाहेर फिरु नये प्रशासनाच्या आदेशाची नागरीकांनी काटेकोरपणे पालन करावा असे जनतेला आवाहन केले आहे.तसेच आणखीन बेड मिळवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे अामदार पाटील यांनी सांगीतले.


 
Top