उस्मानाबाद/ प्रतिनिधी

 पंचायत समिती तुळजापूर कार्यालयाच्या आवारातून औषध उपचारानिमित्त एक अनोळखी पुरुष वय 60 वर्ष दि. 20 सप्टेंबर 2020 रोजी ॲम्बुलन्स मधून दाखल झालेला, तो मयत झाला आहे, असे पोलिस ठाणे तुळजापूर यांनी कळविले आहे.

 या मयताची आजपावेतो ओळख पटलेली नाही. कोविड-19 या संसर्गजन्य आजारामुळे उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथे शवग्रहात प्रेत ठेवणे उचीत नसल्याने त्याचा नगर परिषद तुळजापूर मार्फत दफन विधी घाटशिळ स्मशान भुमी तुळजापूर येथे दि. 01 ऑक्टोबर 2020 रोजी करण्यात आला आहे. मयताचे वर्णन उंची 162 सेंमी, रंग गोरा, सडपातळ बांधा, उभा चेहरा, सरळ नाक, वाढलेली पांढरी दाढी, डोक्याला टक्कल, छातीवर डाव्या बाजूस तीळ, सुनता केलेली असल्याने मुस्लीम समाजाचा असावा, अंगावरती कपडे नसलेला, कातडी शरीराला चिकटलेली याप्रमाणे आहे.

 
Top