उस्मानाबाद/ प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाने “महाराष्ट्र कोव्हीड 19 उपाययोजना नियम, 2020” प्रसिद्ध केले असून करोना विषाणुमुळे (COVID-19) उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण यासाठी जिल्हाधिकारी यांना त्यांचे कार्यक्षेत्रात सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित केले आहे.

 जिल्हा समन्वयक, महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित, उस्मानाबाद यांनी जिल्ह्यात महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (MKCL) या संस्थेची अधिकृत अध्ययन (संगणक प्रशिक्षण) केंद्रे सुरु करण्यास परवानगी मिळणेची विनंती केल्यानुसार.जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कौस्तुभ दिवेगावकर यांनी पुढील अटी व शर्तींच्या आधारे उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (MKCL) या संस्थेची अधिकृत अध्ययन (संगणक प्रशिक्षण) केंद्रे सुरु करण्यास परवानगी देत असल्याचे आदेश जारी केले आहे.

भारत सरकार, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय यांचे   दि. 08 सपटेंबर 2020 रोजीच्या प्रमाणित कार्यपद्धती (SOP) मधील सूचनांचे पालन करणे बंधनकारक राहील. अध्ययन (संगणक प्रशिक्षण) केंद्रामध्ये सामाजिक अंतराचे (6 फूट/2 गज की दूरी) पालन होईल याअनुषंगाने बैठक व्यवस्था करण्यात यावी.  अध्ययन (संगणक प्रशिक्षण) केंद्रामध्ये प्रशिक्षक व प्रशिक्षणार्थींनी फेस कव्हर, गॉगल्स, मास्क/स्वच्छ रुमाल, हॅण्डग्लोव्हज, सॅनिटायझर इ. चा वापर करणे बंधनकारक आहे. अध्ययन (संगणक प्रशिक्षण) केंद्रातील उपकरणांचा वापर करण्यापूर्वी व वापर केल्यानंतर त्यांचे निर्जंतूकीकरण (Sanitization) करण्यात यावे.

अध्ययन (संगणक प्रशिक्षण) केंद्राच्या परिसरात व सार्वजनिक जागी वारंवार स्पर्श केले जाणारे पृष्ठभाग (दरवाजांचे कडी-कोंडे, लिफ्टचे बटन, जिन्यावर लावलेली संरक्षक जाळी (handrail), बाके (benches), स्वच्छतागृहे इ. ची स्वच्छता व नियमित निर्जंतुकीकरण (1 % सोडियम हायपोक्लोराईटचा वापर करुन) करणे अनिवार्य आहे.अध्ययन (संगणक प्रशिक्षण) केंद्राच्या परिसरामध्ये तसेच विशेषत: प्रसाधनगृहे (lavatories), पिण्याच्या पाण्याची व हात धुण्याची ठिकाणे (drinking and hand washing stations/areas) चे ठिकाणी प्रभावीपणे व वारंवार स्वच्छता (sanitization) करण्यात यावी.

अध्ययन (संगणक प्रशिक्षण) केंद्रामध्ये कामकाज करणा-या कर्मचा-यांनी नियमितपणे सॅनिटायझरचा वापर करावा तसेच साबणाने हात स्वच्छ धुवावेत.अध्ययन (संगणक प्रशिक्षण) केंद्रामध्ये प्रशिक्षक व प्रशिक्षणार्थी यांनी प्रशिक्षणादरम्यान डोळे, नाक व तोंडाला स्पर्श करणे कटाक्षाने टाळावे.अध्ययन (संगणक प्रशिक्षण) केंद्रात प्रवेश देण्यापूर्वी प्रशिक्षक व प्रशिक्षणार्थी यांचे थर्मल स्कॅनर व पल्स ऑक्सीमिटरद्वारे तपासणी करावी व नोंदवहीमध्ये त्याबाबतच्या दैनंदिन नोंदी घेण्यात याव्यात.

सर्दी, ताप व श्वासोच्छवास घेण्यास त्रास होणे इ. कोवीड-19 ची लक्षणे असलेल्या प्रशिक्षक व प्रशिक्षणार्थी यांना अध्ययन (संगणक प्रशिक्षण) केंद्रात प्रवेश देऊ नये.भारत सरकार व महाराष्ट्र शासनाचे आरोग्य विभागाने वेळोवेळी दिलेल्या आदेशांचे पालन करणे बंधनकारक राहील. महाराष्ट्र शासन, महसूल व वने, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने नमूद केलेल्या कोव्हीड 19 चे व्यवस्थापनासंदर्भातील राष्ट्रीय सूचनांचे पालन करणे बंधनकारक राहील.

या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था अथवा संघटना उपरोक्त “महाराष्ट्र कोव्हीड 19 उपाययोजना नियम, 2020” चे नियम 11 नुसार, भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 मधील तरतुदींनुसार दंडनिय/कायदेशीर कारवाईस पात्र राहील,असेही आदेशात नमुद केले आहे.


 
Top